आयुर्वेदिक, हर्बल उत्पादनांच्या जाहिरातींना भुलू नका

19
0
Share:

आयुर्वेदिक, हर्बल उत्पादनांच्या फसव्या जाहिराती होत असल्याची माहिती केंद्र सरकारनं राज्यसभेत दिली आहे. गेल्या 3 वर्षात अशी अनेक प्रकरणं आढळून आली असून, त्यावर कारवाई केली जात असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक यांनी सांगितलं.

सध्या आयुर्वेदिक, हर्बल उत्पादनं मोठ्या प्रमाणात वापरली जातात. मग औषधं असो किंवा सौंदर्य प्रसाधनं… आयुर्वेदिक आणि हर्बल असल्याची जाहिरात पाहिली की ती वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. तुम्ही देखील अशाच जाहिराती पाहून आयुर्वेदिक, हर्बल उत्पादनं खरेदी करत आहात, तर सावध व्हा… कारण देशभरात आयुर्वेदिक आणि हर्बल उत्पादनांच्या फसव्या जाहिराती होत आहेत, अशी माहिती केंद्र सरकारनं राज्यसभेत दिली आहे.

आयुर्वेदिक, हर्बल उत्पादनांच्या फसव्या जाहिरातींबाबत राज्यसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक यांनी दिलेल्या राज्यसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार,

वर्ष फसव्या जाहिराती

2016 204

2017 547

2018 358

केंद्रीय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक राज्यसभेत सांगितलं की, “Grievances Against Misleading Advertisements (GAMA) कडून फसव्या जाहिरातींबाबत माहिती मिळालेली आहे. Advertising Standards Council of India (ASCI) नं 20 जानेवारी, 2017 ते 19 जानेवारी, 2018 आणि 1 एप्रिल, 2018 ते 30 नोव्हेंबर 2018 दरम्यान फसव्या जाहिरातींची 960 प्रकरणं हाताळली असल्याचं सांगितलं आहे.”

Share: