सैन्य दलातील जवानांचे फोटो प्रचारात वापरू नका : निवडणूक आयोग

26
0
Share:

कोणत्याही राजकीय पक्षांनी संरक्षण दलातील जवानांचे छायाचित्र निवडणूक प्रचारांमध्ये वापरू नये, अशी सक्त ताकीद केंद्रीय निवडणूनक आयोगाने दिली आहे.

हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकची कारवाई, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानातून सुटका आणि पाकिस्तान विरोधात भारताने केलेल्या कारवायांच्या फोटोंचा वापर प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी पोस्टर्सवर केला. या प्रकरणाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. यामध्ये आयोगाने स्पष्ट केले, की संरक्षण विभागातील व्यक्तींची छायाचित्रे विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांकडून निवडणूक प्रचारासाठी वापरली जात आहेत, अशी माहिती संरक्षण विभागाने निवडणूक आयोगाला दिली. याबाबत राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांना आवश्यक त्या सूचना देण्याची विनंती संरक्षण विभागाकडून करण्यात आली होती. संरक्षण विभागाच्या या विनंतीनुसार निवडणूक आयोगाकडून याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत, असे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे

Share: