डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

20
0
Share:

मुंबई: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर 7 जुलैला दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशाल अशोक मोरे उर्फ विठ्ठल काण्या असे या आरोपीचे नाव आहे. तो 20 वर्षांचा आहे.(Dr. Babasaheb Ambedkar’s ‘Rajgriha’ in Mumbai has been arrested)

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर 7 जुलैला तोडफोड केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास करुन एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीचे नाव उमेश सीताराम जाधव असं आहे. उमेश हा हल्लेखोरांच्या सोबत होता. उमेशकडून माहिती घेऊन पोलीस प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध घेत होते.
यानंतर आज (22 जुलै) मुख्य आरोपी असलेल्या विशाल मोरेला अटक करण्यात आली. विशाल अशोक मोरे उर्फ विठ्ठल काण्या असे या आरोपीचे नाव आहे. तो 20 वर्षांचा आहे. विठ्ठल काण्या हा मजूर आहे. तो कल्याण स्टेशन येथे राहतो.

नेमकं काय घडलं?
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर दोन माथेफिरुंनी मंगळवारी (7 जुलै) संध्याकाळच्या सुमारास तोडफोड केली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर दोन माथेफिरुंनी तोडफोड केली. संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास एक निळ्या रंगाचे शर्ट घातलेला तरुण घटनास्थळी आला. त्या तरुणाने राजगृहाच्या गेटसमोर येत दगडफेक केली. जवळपास आठ-नऊ दगड त्याने राजगृहाच्या दिशेने भिरकावले. यानंतर हा तरुण गेट उघडून आत शिरला. त्याने कुंड्यांचे नुकसान केले, हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे

The main accused in the attack on Dr. Babasaheb Ambedkar’s ‘Rajgriha’ in Mumbai has been arrested

Share: