सरकारच्या कठीण धोरणामुळे APMC मधील व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

5
0
Share:

पणन मंत्रालयाने नियमन शिथिल केल्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. नियम शिथिल म्हणजे आत्ता शेतकरी आपला माल बाजारात न आणताच तो माल बाहेर परस्पर त्याची विक्री करू शकतो या सरकारच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारात खूप मोठा फटका बसला आहे. व्यापाऱ्यांनीचं सर्व नियमांचं पालन का करावं आणि आम्हालाच हे सर्व नियम का पाळावे हा आत्ता व्यापाऱ्यांचा सवाल आहे.

सुरेश शिंदे : सचिव – ओम साई कांदा बटाटा अडता संघ

कांदा बटाटा मार्केट मध्ये खूप काही अंतर्गत समस्या नाही आहे परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला आमच्या व्यापारावर फटका बसला आहे मागच्या काही वर्षाच्या तुलनेत व्यापारात बरीच घट झाली आहे. APMC ला एक नियम आणि बाहेर एक नवीन नियम यामुळे विषमता निर्माण झाली आहे या चुकीच्या पणन मंत्रालयाच्या धोरणामुळे शेतकऱ्याच्या नावाखाली पुढारी,ठगे,गुंड हे आज बाहेर सर्रासपणे व्यापार करत आहे त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य व्यापाऱ्यांनवर अन्याय होत आहे.

आमच्या कांदा बटाटा मार्केट मध्ये ऐकून 425 व्यापारी आहेत त्यांच्या हाताखाली जवळजवळ 800 मदतनीस काम करत आहे आणि संपूर्ण कांदा बटाटा मार्केट मध्ये माथाडी कामगारांची संख्या 1500 ते 2000 च्या दरम्यान आहे. गटर, मीटर,पाणी या सुविधा या मार्केट मध्ये उपलब्ध आहे फक्त एकच मार्केट मध्ये समस्या आहे ती अनधिकृत पार्किंग ची आणि त्याला तरी काय करणार मार्केट मध्ये उभ्या राहणाऱ्या सर्व गाड्या या आमच्याच व्यापारी आणि कामगार यांचेच आहे त्यामुळे नक्की तक्रार कोणाला करणार हा प्रश्नच?

2005 साली आमच्या मार्केट कांदा बटाटा मार्केटला सिडकोने धोकादायक ठरवले आहे तेव्हा पासून ते आत्तापर्यंत मार्केटची पुनर्बांधणी चा मुद्दा हा लटकतच राहिला आहे सारखं बाजारसमितीची आणि व्यापाऱ्यांची बैठक होते आणि ती निष्फळ ठरते आणि एकमतचं होत नाही.

शासनाने नवीन उपक्रम आणला आहे ईनाम हा नक्की उपक्रम काय आहे या संदर्भात आम्हीच साशंकित आहोत. या संपूर्ण ईनाम प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा आणि व्यापारी या दोघांचा डेटा जमा केला जातो आणि आम्हाला भीती आहे की हा आपला डेटा चोरीला गेला तर? त्यामुळे मोठा संभ्रम आमच्या आणि शेतकऱ्यांच्या मनात आहे.

Share: