मुंबई एपीएमसीत फळ बाजारातील पाहणी दौऱ्या दरम्यान सचिव यांनी घेतला घाण व अनधिकृत बाबींचा आढावा

22
0
Share:

मुंबई एपीएमसीचे वरिष्ठ अधीक्षक अभियंता व विकास शाखाचा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बाजार आवारात अनधिकृत बांधकाम

-पेंढ्याचा गरजेपेक्षा जास्त साठा

-पसेजच्या अनधिकृतपणे वापर

-मार्केटच्या वर झोपड्या व अनधिकृत बांधकाम

बाजार समितीच्या फळ व भाजी मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे

बांग्लादेशि नागरिकांच्या साहाय्याने चालतो फळ बाजार

नवी मुंबई:कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी मधील फळ आणि भाजीपाला बाजारात स्वछता आणि निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले होते याची पाहणी करण्यासाठी एपीएमसी प्रशासक अनिल चव्हाण यांनी 12 बाजता पाहणी दौरा केला असता त्यांना फळ बाजारात लिलावगृह समोर घाणीचे साम्राज्य पाहायला मिळाले शिवाय लिलावगृह ते N गेट पर्यंत पसेजच्या अनधिकृत पणे वापर होत आहे तिथे गर्जे पेक्षा जास्त पेंढा,फळया व कागदी पुठे ठेवल्याचे निष्पन्न झाले .
पेंढा व पुठा ठेवण्यासाठी प्रत्यकी शंभर sq फीट जागा बाजार समिती कडून देण्यात आली होती मात्र तिथे 1000 ते 2000 sq फीट पेक्ष्या जास्त जागेचा वापर होत असताना दिसून आले .शिवाय बाजार इमारतीच्या वरील भागात झोपड्या व अनधिकृत बांधकाम करण्यात आली आहे त्या मध्ये काही लोक राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे, ते लोक तिथे जेवण बनवतात आणि अंघोळी ही करतात दिसून आले त्यामुळे तिथल्या घाणीमध्ये आणखीन भर पडते.आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठे मध्ये असे दृशय दिसून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रामध्ये सर्वत्र गुटखा विक्री असली तरी एपीएमसीच्या प्रत्येक टपरीवर विमलसह सर्व प्रकारचा गुटखा सहजपणे उपलब्ध असतो बाजार समितीच्या अधीक्षक अभियंता व विकास शाखा कडून देण्यात आलेल्या पान टापर्यावर हे कारभार चालतो ,

-बाजार समितीच्या फळ व भाजी मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बांगलादेशी नागरिकांचे सर्वात मोठे आश्रयस्थान म्हणूनही एपीएमसी मार्केटची ओळख झाली आहे. पश्चिम बंगालमधून बांगलादेशी येथे कामानिमित्त येत आहेत त्यामुळे विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय कामगारांविरोधात काहीही ठोस कारवाई केली जात नाही. गुन्हेगारांनी मार्केटमध्ये आश्रय घेण्यास सुरवात केली असल्यामुळे एपीएमसीबरोबर देशाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह आहे.प्रश्शासन जागे होणार का असा प्रश्नही दक्ष नागरिक विचारत आहेत.

या पाहणी दौऱ्यात बाजार आवारात ज्या ज्या अनधिकृत गोष्टी दिसल्या त्याचावर कारवाई करण्याची आदेश बाजारसमितीचे प्रशासक व सचिव अनिल चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.
-मुंबई एपीएमसी प्रशासक व सचिव -अनिल चव्हाण

-पाहणी दौऱ्यात फळ मार्केटच्या संचालक यांनी सांगितले की ,कोरोनाचा पार्श्वभूमीवर प्रशासक जी कारवाई करेल त्याला प्रेत्येक व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर प्रशासन सक्त कारवाई करावी .
फळ मार्केट संचालक -संजय पानसरे

Share: