शेतकऱ्यांना फसवणाऱ्या साखरसम्राट रत्नाकर गुट्टेवर ईडी कारवाई, कोट्यावधीनची मालमत्ता केली जप्त

15
0
Share:

राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर ईडी कडून मोठी कारवाई करण्यात आली . ईडीने रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ६३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पीक खरेदी करताना रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांची माहिती घेत एक डेटा बँक तयार केला. यानंतर गंगाखेड साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज मिळवण्याच्या उद्देशाने काही बँकांशी जोडला गेला.
या बँक घोटाळ्यावरुन ईडीने कारवाई केली असून २५५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. रत्नाकर गुट्टे यांनी इतरांच्या मदतीने गरीब शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या कृषी कर्ज योजनेचा गैरफायदा घेतल्याचा ईडीचा आरोप आहे.
थोडक्यात बँकांसाठी ते एजंट झाले आणि शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली.
या कर्ज योजनेअंतर्गत बँका ऊस शेतकऱ्यांना जमिनीच्या आधारे पीकांसाठी महत्वाच्या गोष्टी बियाणं, खतं, ट्रॅक्टर, पंप यांसारख्या गोष्टी खरेदी करण्यासाठी पैसा देत असल्याच  ईडीने सांगितलं आहे की, तपासात गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उपलब्ध माहितीचा गैरफायदा घेत त्यांच्या नावे कर्ज घेतलं. बँकांनी २०१२-१३ ते २०१६-१७ दरम्यान जवळपास ७७२ कोटींचं कर्ज मंजूर केलं आणि ६३२ कोटींची वाटप केलं. हे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. दुसरीकडे गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांकडून मिळालेल्या स्वाक्षरीचा फायदा घेत हे पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टाकले. कंपनीने हा पैसे जमीन तसंच शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी वापरले. असे ही ईडी कडून सांगण्यात आले आहेत .

Share: