मुंबई एपीएमसी मार्केट मध्ये खादय तेलात २५ रुपये वाढ !

Share:

नवी मुंबई : मकर संक्रांतीला तिळ-गुळाचं अनन्य साधारण महत्वं आहे. नात्यांमध्ये गोडी राहावी या उद्देशानं एकमेकांना तीळगुळ देत गोड-गोड बोलण्याची विनंती केली जाते. तसंच जानेवारी महिन्यात थंडी मोठ्या प्रमाणात असते. थंड वातावरणात शरीराचं रक्षण करण्यासाठी तिळ-गुळ खाल्ले जातात. तीळ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे. तीळ उष्ण असल्यानं थंडीमध्ये शरीरात उष्णता निर्माण करतात.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी महागल्या आहेत. असं असलं तरी सर्वसामान्यांची यंदाची संक्रांत मात्र गोड होणार आहे. कारण नवी मुंबई एपीएमसी मार्केट मध्ये तिळ-गुळाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे तिळ-गुळाचे दर मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पांढरे तीळ किरकोळ बाजारात १८० रुपये किलो आहेत. तर लाल तीळ १८० रुपये किलो आहेत. त्यामुळे यंदाची मकरसंक्रांत गोड होणार आहे.
सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाच्या किमतींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, सूर्यफूल, सरकी, पामतेलाचा समावेश आहे. अतिवृष्टी आणि पावसामुळे तेलबियांच्या उत्पादनाला फटका बसलाय. तसंच आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्यानं खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत झालेली वाढ पुढील 2 ते 3 महिने कायम राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून स्वयंपाकासाठी पामतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर अन्नप्रक्रिया उद्योगातही पामतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र पामतेलाची किंमत जवळपास 120 हून अधिक झाल्यानं सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाच्या किंतीत वाढ झाल्याने, सर्वसामान्यांचं बजेट बिघडलंय. दोन महिन्यात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या खाद्यतेलाचे दर २५ रु. प्रति किलो वाढलेय. त्यामुळे किरकोळ बाजारात सोयाबीन तेलाचा दर आता १२५ रुपये किलोंवर पोहोचले आहेत. पाम तेलाच्या दरातंही वाढ झाली असून, किरकोळ बाजारात पाम तेलाचे दर ११० रुपये किलोंवर पोहोचलेय.

खाद्यतेलाच्या किमती का वाढत आहेत?

भारतात सर्वसाधारणपणे 70 टक्के खाद्यतेल हे परदेशातून आयात केलं जातं. तर 30 टक्के भारतात तयार होतं. यंदा कोरोना संकटामुळं अन्य देशांमधून होणारी खाद्यतेलाची आयात ठप्प झाली होती. त्यातच केंद्र सरकारनं पामतेलावरील आयात शुल्क वाढवलं आहे. त्याचा परिणाम खाद्यतेलांच्या किंमतीवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळं सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळे उत्पन्नात घट झाली. त्याचा परिणामही खाद्यतेलाच्या निर्मितीवर झाला आहे.

नवी मुंबई किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे दर
तेल प्रति किलो दर

सोयाबीन १२५ रु.

सूर्यफूल १२५ रु.

शेंगदाणा ११२ रु.

पाम ११० रु.

जवस १२० रु.

 

Share: