इजिप्तचा कांदा वाशी एपीएमसी मध्ये दाखल ,शेतकऱ्यांना फटका बसणार

4
0
Share:
नवी मुंबई-आपल्या  कडील  कांदा आत्ता संपल्यातच जमा असल्याने बाजारात कांद्याची  टंचाई आहे.  त्यामुले  नेहमीच्या मानाने दर हि वाढले आहेत .आणि याच मुले शासनाने कांद्याच्या निर्यातीवर हि बंदी घातली आहे. यामुळे कांद्याची हि टंचाई लक्षात घेता मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी इजिप्तहून कांदा मागवला होता. तो कांदा आज वाशीतील घाऊक बाजारात दाखल झाला आहे. 18 ते 20 रु किलो दराने हा कांदा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र खरेदीदारांचा या कांद्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुले हा कांदा बाजारात पडून होता.
 मागच्या महिन्यात आपल्या कडे  कांद्याची  मोठी टंचाई असताना बाजारात कांद्याची असलेली  मागणी पूर्ण करण्यासाठी बाजारातील  घाऊक व्यापाऱ्यांनी परदेशातून कांद्या मागवला होता. त्यानुसार आत्ता इजिप्त मधून कांद्याचे ४ कंटेनर जे एन पी टी बंदरात दाखल झाले आहेत. त्यातील एक कंटेनर आज वाशीच्या  घाऊक बाजारात आला होता.  त्यात  वीस टन कांदा होता.  भैरवनाथ ट्रेडिंग कंपनी मध्ये तो आला होता. आज या कांद्याचा दर 18 ते 20 रु किलो इतका होता. मात्र या कांद्याला बाजारात उठाव मिळाला नाही.
 आत्ता आपल्याकडे नवीन कांद्याची आवक सुरु झाली आहे त्यामुले मागच्या महिन्यात  ४० ते ४५ रु किलो झालेला कांदा आज २० ते २५ रु किलो झाला आहे. त्यातच हा इजिप्तचा कांदा बाजारात 18 ते 20 रुपये असला तरी त्याला उठाव नसल्याची परिस्थती होती. कारण हा कांदा दिसायला आपल्या कांद्यासारखा असला तरी तो आपल्या कांद्यासारखा  भरीव  नाहीय . तो आत मध्ये पोकळ असल्याने त्या कांद्याला आपल्या देशी कांद्याची सर नाहीय. तिखटपणा कमी असल्याने हा कांदा खरेदी करायला लोक पुढे येत नाहीत. असा कांदा हॉटेल  मध्ये वापरासाठीच पाठवला जातो. विशेष म्हणजे सध्या ज्या दरात आपला देशी कांदा मिळत आहे त्याच दरात  कमी गुणवत्ता असलेला परदेशी कांदा घ्यायला कुणी तयार नसल्याचेच दिसत होते.
Share: