लोकसभेचा नगाडा वाजला, ११ एप्रिल पासून मतदान २३ मे ला मतमोजणी

4
0
Share:

आगामी लोकसभा निवडणुका केव्हा जाहीर होणार याकडे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले होते. मात्र, आता या निवडणुकीचे बिगूल अखेर वाजले. देशभरात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. ११ एप्रिल ते १९ मे यादरम्यान मतदान होणार असून, या निवडणुकांचे निकाल २३ मे रोजी जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (रविवार) दिली. असेही ते म्हणाले.

विज्ञान भवन येथे पहिल्यांदाच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. यावेळी आयोगाने या सर्व बाबींची माहिती दिली. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. अरोरा म्हणाले, राजकीय पक्षांची चर्चा झाली आहे. देशातील मतदारांची संख्या सुमारे ९० कोटींपर्यंत आता गेली आहे. दीड कोटी नोकरदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. विविध राज्यांतील परीक्षांचाही मतदानाच्या तारखा नियोजित करण्यापूर्वी विचार करण्यात आला. २०१४ पेक्षा ७ कोटी मतदार वाढले. लोकसभेसाठी १० लाख मतदान केंद्र असणार आहेत. ईव्हीएमवर उमेदवारांचा फोटोही असणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असून, याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही अरोरा म्हणाले.

तसेच आचारसंहिता भंग झाल्यास त्याची तक्रार मोबाईलवरूनही करता येणार आहे. ईव्हीएमवर जीपीएसच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. ‘पेड न्यूज’वर कारवाई कडक कारवाई केली जाईल.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या तारखांबाबत जोरदार चर्चा सुरू होती. या निवडणुकांची घोषणा ८ मार्चलाच होईल, असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, आज अखेर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान ही माहिती देण्यात आली.

Share: