Apmc News:मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आपत्कालीन व्यवस्था शून्य, बाजार समितीला तातडीने विसर्जित करा, व्यापारी, ग्राहक व माथाडी कामगारांची मागणी 

36
0
Share:
-मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीआपत्कालीन व्यवस्था शून्य,
बाजार समितीला तातडीने विसर्जित करण्याची व्यापारी, ग्राहक व माथाडी कामगारांची मागणी 
नवी मुंबई: मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची काहीच व्यवस्था उपलब्ध नाही. व्यवस्था तर सोडाच, कुठलीही आपातकालीन स्थितीत एक साधी उपाययोजना करण्याची क्षमता सुद्धा नाही आहे. म्हणून येथील सर्व घाउक व्यापारी, येणारे सर्व गाहक आणि माथाडी कामगाराने पणनमंत्र्याशी मांगणी केली आहे की  काहीच सुविधा नसलेली या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीलाच तातडीने विसर्जित करून व्यापारी,ग्राहक व माथाडी कामगारांचे रक्षण करा. 

वाशीच्या अत्यंत मोठे कृषि बाजारपेठचा प्रशासन साम्हाळणारा मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती प्रशासनाच्या भोंगळ, भ्रष्ट, कामचुकार व अत्यंत निकृष्ट बेजबाबदार कारभारामुळे भाजीपाला व फळ मार्केटमध्ये तीन ते चार फुटापर्यंत पाणी तुंबले आहे आणि चारीबाजुने दुर्गंधी, चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर समस्येकडे एपीएमसी प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

एशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दररोज हजार पेक्षा जास्त  गाड्याची आवक होतात म्हणून या मार्केट परिसरला स्वच्छ ठेवणासाठी स्वच्छता अधिकारी नेमणूक करण्यात आली आहे. या स्वच्छतेचे नावाखाली बाजारसमितीकडून कोट्यवधी रुपये (बहुतेक फ़क्त कागदावरच) खर्च केला जातो पण मार्केट परिसरात सध्या घाणी चिखल आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. 
बाजारात सर्व ठिकाणी रस्त्याच्या कडेला पडलेला भाजीपाला, फळांचे ढीग सडल्यामुळे ही दुर्गंधी सुटली आहे. या मुळे येथील सर्व ड्रेनेज लाईन पूर्णपणे चोकऑप झाली आहे.समितीच्या कार्यालयालगत सुटलेल्या अत्यंत तीव्र दुर्गंधीतून सुटका करण्याच्या प्रयत्नाकडे समिती कडून दुर्लक्ष होत आहे.

वाशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा बटाटा, भाजीपाला, फळे, मसाला आणि दाणा मार्केट अशी पाच मार्केट आहेत. या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल अडत्यामार्फत किरकोळ व्यापाऱ्यांना विकला जातो. अनेक शेतकरी, व्यापारी मालाची खरेदी-विक्री करतात. येथे कांदा बटाटे, भाजीपाला, फळे विकली जातात. मात्र सध्या या बाजार समितीत जाणे नकोसे झाले आहे. विकल्या न गेलेल्या मालाचे ढीग बाजार समितीच्या लागत असलेल्या रस्त्यावर टाकले जात आहेत. याची विल्हेवाट न लावल्यामुळे या कचऱ्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात सुटली आहे. बाजारात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना नाक दाबून खरेदी करावी लागत आहे. भाजीपाला मार्केट व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारासोरच कचऱ्याचे मोठ मोठे ढीग टाकले जातात आणि या मुळे पावसाळ्याचे जमा झालेल्या गुडघेवर पाण्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या वरोवर ग्राहकांना मोठ्या त्रास सहन करावा लागत आहे.
या बाबत आरटीआय ऍक्टिव्हिस्ट अनिल पवार सांगितले प्रमाणे बाजार समितीत दरवेळी स्वछताच्या नावाने मोठ मोठे टेंडर काढल्या जातात पण ड्रेनेज लाईन साफसफाई किंवा काही ही काम ना करताना सरसकट बिल पास केला जातो ज्या मुले दर वर्षी थोड्याच पावस पडला की मार्केट पाण्या खाली जातो. 
या साठी स्वच्छता अधिकारी सतीश कटकधोंड, झुल्फिकार सैयद हे दोघे पूर्णपणे जबाबदार आहेस्वछताच्या नावाने कोट्यवधी रुपये भ्रष्टाचार होतो असे गंभीर आरोप पवारने लावली आहेबाजार समितीकडे वारंवार तक्रार करून सुद्धा तरीदेखील समितीकडून कोणावरही कारवाई केली जात नाही.मार्केट मध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यां,ग्राहकांना कायम पाण्यात व सडलेल्या कचऱ्याचा दुर्गंध सहन करावा लागतो.
कोट्यवधी रुपयांची शेष भरून सुद्धा नागरिकांमध्ये पाण्याच्या पुरामुळे प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. कांदा बटाटा मार्केट मध्ये पाणी शिरले आहे. गणपतीच्या आरास आणि मूर्तीही पाण्याखाली गेल्या आहेत. सगळीकडे गटारे आणि नाले तुंबलेल्याने पाण्याचा निचरा होत नाही. सर्वांत शोकांतिका म्हणजे बाजारसमितीकडे पाणी काढणारे जे सक्शन पंप आहे ते लहान आहे. त्यामुळे बाजार समितीची आपत्कालीन व्यवस्था केवळ कागदावरच राहिली आहे. त्याचा फटका व्यापारी,माथाडी कामगार व नागरिकांना बसला आहे.
कोटींचा विकास प्रारूप आराखडा तयार केल्याची नुकतीच बाजार समितीचे सभागृहात घोषणा केली. प्रत्यक्षात दहा ते पंधरा हजार रुपये किमतीचे सक्शन पंप खरेदी करण्याची बाजार समितीची मानसिकता नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती पूर्णतः अपयशी ठरली असून त्यांच्या नाकर्तेपणामुळे नैसर्गिक आपत्तीला निमंत्रण मिळत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती पणन मंडळ आणि त्यांच्या पणन मंत्रीच्या खात्याने त्वरित विसर्जित करावी, अशी गंभीर परंतु सत्यनिष्ठ मागणी व्यापारी,माथाडी कामगार आणि ग्राहकांनी केली आहे.
अतिशय क्लेशदायक घटना
बाजारसमितीच्या भाजीपाला आणि फ़ळ मार्केटच्या प्रवेशद्वार मधून वाहणारा नाल्याची सफाई न केल्याने परिसरात तीन फुट पाणी साचले आहे. पांच मार्केटमध्ये सध्या गणपतीचे मंडप आहे. मात्र तेथे साचलेले पाणी काढण्यासाठी बाजारसमितीकडे पंप मागण्यात आला पण पंप आलीच नाही.
नागरिकांना वाली कोण?
नागरिक नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहेत. बाजारसमितीकडून त्यांना कोणतीच आपत्कालीन मदत मिळत नाही. त्यांचे हाल होत आहेत. बाजारपेठ मध्ये येणाऱ्या ग्राहक कमी झाली आहे व्यापाराची माल खराब होउन सडले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसान होत आहे .गुडघेवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्यांना वाली कोण असा प्रश्न व्यापारी,मापडी, माथाडी कामगार व ग्राहक उपस्थित करत आहे.

Share: