Breaking News:द्राक्षांची निर्यात सुरू; तीन दिवसात २० हजार टन द्राक्षांची निर्यात

5
0
Share:

वाहतूक व निर्यातीत होणारा अडथळा दूर करण्यासाठी  APMC मध्ये कंट्रोलरूम सज्ज ,

-समिती कडून 022-27889191 या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू.

द्राक्षांची निर्यात  सुरू,आता  हापूूस आंंब्याच्या वारी,तीन दिवसात २० हजार टन द्राक्षांची निर्यात

-लॉक डाऊनमुळे जेएनपीटी परिसरात अडकले होते.

-कोकण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली निर्यात सुरळीत.
बाजारात 30 हजार पेट्या हापूस आंबाच्या आवक .

– हापूस आंब्याच्या खरेदीसाठी निर्यातदार बाजारात दाखल

-चार दिवसात हापुस आंबा निर्यात होणार.

नवी मुंबई:अनेक दिवासांपासून अडचणीत सापडलेल्या द्राक्ष उत्पादकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. कोरोना व्हायरसमुळे द्राक्षांची निर्यात थांबविण्यात आली होती,द्राक्ष व आंब्याची वाहतूक व निर्यात सुरळीत करण्यासाठी कोकण आयुक शिवाजी दौंड यांनी पुढाकार घेऊन एपीएमसी बाजार प्रशासन कडून एक समिती स्थपणा करण्यात आले होते या समितीमध्ये कस्टम,जेएनपीटी, एपीएमसी प्रशासन,पणनअधिकारी,पोलीस,वाहतूक,एमआयडीसी, लाजीस्टिकचे अधिकारी व कर्मचारी या समिती मध्ये समावेश आहे.

वाहतूक व निर्यातीत होणारा अडथळा दूर करण्यासाठी या समिती कडून 022-27889191 या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.कुठल्याही निर्यातदारला निर्यातीत अडथळा आल्यास या नंबरवर संपर्क करण्याचा आव्हान बाजार प्रशासनतर्फ़े करण्यात आले आहे त्यामुळे द्राक्ष व आंबा विक्री व निर्यतीला दिलासा दायक वातावरण दिसून येत आहे . निर्यात पुन्हा सुरू होऊन साधारण तीन दिवस झाले असून आतापर्यंत 25 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चालू वर्षी निर्यातीसाठी सुमारे 38 हजार द्राक्ष बांगांची नोंदणी झाली आहे. काही शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यात सुरू केली होती. राज्यातून 21 मार्चपर्यंत 5 हजार 600 द्राक्ष कंटेनरद्वारे जवनळपास 78 हजार टन द्राक्ष नेदरलँड, युके, जर्मनीला पाठविण्यात आले होते. मात्र शासनाने कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू केल्याने निर्यात थांबविण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. स्थानिक बाजारात ही दर कमी मिळत होता. लॉकडाऊनच्या स्थितीमुळे खरेददार बाहेर पडत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. संबंधित विभागाच्या समन्वयाने निर्यात सुरू झाली आहे.
त्यामुळे 1 एप्रिलपर्यंत युरोपला 79 हजार 500 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. निर्यात सुरू झाल्यानंतर 30 मार्च रोजी द्राक्षाचे 38 कंटेनर युरोपला पाठविण्यात आले. तर 31 मार्चला 19 तर एप्रिलला 11 असे एकूण 68 कंटनेर द्राक्ष निर्यात झाली आहे. राज्यातून सर्वाधिक निर्यात सांगली आणि नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. यासह सोलापूर, लातूर, याभागातून निर्यात झाली असून पण नाशिक सांगलीच्या तुलनेने कमी आहे. दरम्यान स्थानिक बाजारपेठेत उत्पादक ते ग्राहक अशी गटांमार्फत विक्री सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे परवानेही मिळवून देण्यासाठी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान शासनाने अत्यावश्यक सेवेमध्ये फळे व भाजीपाला त्याचबरोबर खते, बियाणे, कीटकनाशके, डिझेल यांचाही समावेश केला आहे. याशिवाय निर्यातीसाठी आवश्यक असलेले कंटनेर चालू ठेवण्याचे आदेश दिले. मुंबईतील जेएनपीटी बंदर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आंबा व द्राक्ष उत्पादका शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा मिळणार आहे.

Share: