कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांचे थकीत रक्कम आडत्याचा गाळा विकून परत केल्यामुळे शेतकरी आनंदित आहे

31
0
Share:

वाशी (नवी मुंबई): मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केट मध्ये आडते सूर्यकांत ढोले , गाळा क्रमांक एम ८६५ यांनी एकूण ४४ शेतकऱ्याचे डाळींब शेतमालाची विक्री रक्कम रु ५८ लक्ष रुपये अदा न केल्यामुळे संबधित शेतकरी हवालदिल होते त्यांनी संबधित माहिती बाजार समितीकडे लेखी स्वरूपात दाखल केली सदर बाजार समितीने या मुद्द्यावर सुनावणी घेऊन संबधित शेतकऱ्यांचे थकीत पैसे परत करण्यासंदर्भात आडत्याला नोटीस दिल्या होत्या परंतु संबंधित व्यापा-याने सदर नोटीशीची दखल न घेतल्यामुळे बाजार समितीने सदर व्यापा-याचा गाळा क्र.एम-865 जप्त करुन सदर गाळयाची जाहीर लिलाव पध्दतीने विक्री करण्यात आली. गाळा विक्रीतून प्राप्त झालेली रक्कम रु. 41,01,111/-, 44 शेतक-यांना त्यांच्या देय्य रकमेच्या 70 टक्के प्रमाणे सम प्रमाणात वाटप करण्याचा बाजार समितीने निर्णय घेतला.त्या प्रमाणे आज दिनांक 11/02/2019 रोजी मा.प्रशासक श्री.सतिश सोनी व मा. सचिव, श्री. अनिल चव्हाण यांच्या हस्ते औरंगाबाद येथील शेतकरी श्री.लळाजी मते, श्री.भाऊसाहेब मते, श्री.सोमनाथ ससेमहाल, श्री.भिमराव चौधरी यांच्या डाळिंब या शेतमालाची थकित रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यात आली. यावेळी श्री.अविनाश देशपांडे, सह सचिव, श्री.बी.डी.कामिटे, विशेष कार्य अधिकारी, श्री.राजाराम धोंडकर, उप सचिव, फळ मार्केट व श्री.मंदार साळवी, मुख्य लेखाधिकारी इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

Share: