शेतकरी कंगाल,भाजीपाला व्यापारी मालामाल

132
0
Share:

-मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला घाऊक बाजारात प्रकार

-घाऊक बाजारात प्रतिकिलो 30 ते 60 रुपये किलो बिकला जातात भाजीपाला

-शेतकऱ्यांना मिळतात 5 ते 10 रुपये

नवी मुंबई: शहरातील ग्राहक शेतीमाल खरेदी करतो, त्या वेळी बऱ्याचदा जादा दरांबाबत नेहमी तक्रार असते. प्रत्यक्षात बहुतांशवेळा शेतकरी बाजार समितीमध्ये शेतीमाल विकतो, त्या वेळी पडले त्या भावात आडते, व्यापाऱ्यांना विक्री करावी लागते. हाच शेतीमाल मध्यस्थ साखळीद्वारे शहरात ग्राहकांना विकला जातो आणि अव्वाच्या सव्वा नफा मिळवितात, असे एपीएमसी न्युजने शेतकरी ते ग्राहक दराच्या केलेल्या पाहणीतील निष्कर्षातून समोर आले आहे.

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आलेला माल शहर, उपनगराततील मॉल, गाळे अाणि खुल्या ठिकाणी विक्री केला जातो. शेतकऱ्यांकडून अडत्यांकडे, अडत्यांकडून खरेदीदारांकडे आणि खरेदीदारांकडून मॉल, गाळे व किरकोळ विक्रीपर्यंतच्या साखळीतील नफेखोरी ग्राहकापर्यंत जाते तेव्हा शेतकऱ्याला अल्प मोबदला मिळालेला असताना ग्राहकाला तो अधिक दरानेही खरेदी करावा लागतो.

एपीएमसी न्युजने अलीकडेच भाजीपाला घाऊक बाजारात केलेल्या सर्वेक्षणातून शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत प्रकार्षाने समोर आली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजारपेठ असून. या बाजारसमितीमध्ये घाऊक भाजीपाला मार्केट आहे ,घाऊक बाजारात पांच विंग आहे,या मार्केट मध्ये सध्या काही व्यापरण्यांनी व्यापार न करता आपल्या गाळे भाडेवर दिले आहेत ,एक गळ्या मध्ये 4 ते 5 लोग व्यापार करतात ,सध्या घाऊक बाजार आवारात दोन विभाग झाली आहे D विंग मध्ये पूर्णपणे किरकोळ दरात भाज्या बिकले जात आहे,D विंग मध्ये भाजीपाल्याची प्रति किलो 30 ते 70 रुपये पर्यंत बिकले जात आहे E विंगमध्ये 15 ते 30 रुपये किलो बिकले जात आहे असा प्रकारे सध्या भाजीपाला घाऊक बाजार आणि किरकोळ बाजार अशे दोन प्रकार पडलेले आहेत कारण होलसेल मार्केट मध्ये कमी किमतीत मालाची विक्री केली जाते तर किरकोळ मार्केट मध्ये दुप्पट भावाने माल विकला जातो अशी परिस्थिती apmc मार्केटची झाली आहे एकीकडे कमी किमतीला विकला जाणारा माल तर दुसरीकडे मात्र हाच माल दुप्पट किमतीच्या भावाने विकला जातो याचे कारण असे की व्यापाऱ्यांना जागेचे भाडे हे महिन्याला 1 ते दीड लाख रुपये द्यावे लागते त्यामुळे apmc मार्केट मध्ये भाजीपाल्याचे एकच मार्केट असून जागेच्या भाड्याच्या किमतींमुळे व्यापारी भाज्यांचे भाव वाढवत आहेत त्यामुळे त्याचा परिणाम शेतकर्यांवर ग्राहकांवर झालेला दिसून येत आहेत । एपीएमसी न्युजने या बाबतीत पूर्ण बाजारात काही व्यापाऱ्याना विचारपूस केलं असताना व्यापाऱ्यांनी सांगितले कि बाजारसमिती मध्ये काही अधिकाऱ्यांनी D विंगमधील भाजीपाला किरकोळ भावमध्ये विकायला साठी खुली सूट दिली आहे ।

Share: