किसानसभेच शेतकऱ्याचं लाल वादळ मुंबईच्या दिशेने

6
0
Share:

पुन्हा एकदा आपल्या मागण्या घेऊन शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक: काल अखिल भारतीय किसान सभा याच्या वतीने पुन्हा एकदा हजारोच्या संख्येत शेतकरी रस्त्यावर उतरून नाशिक ते मुंबई असा लॉंग मार्च ला निघाले आहे आणि ७ दिवसानंतर हे शेतकऱ्याचं लाल वादळ मुंबईत येऊन ठोकणार आहे हे सगळं काही शेतकरी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी करत आहे गेल्या वेळी देखील असाच लॉंग मार्च नाशिक ते मुंबई करण्यात आला या मार्च दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना जे काही आश्वासन दिले त्यांची कोणतीही पूर्तता झाली नाही आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडलं आहे सध्या तरी हेच चित्र आपल्याला बघायला मिळत आहे.

एकीकडे आपले जवान युद्धभूमीवर शहीद होत आहेत आणि इकडे शेतकरी बंडाचा ईशारा दिला आहे त्यामुळे या सर्व प्रकरणात सत्ताधारी आणि सरकारची गोची होणार हे नक्की आणि लोकसभा निवडणुका या काही दिवसांवर येउ राहिल्या असताना शेतकऱ्याचां पुन्हा एकदा हजारोच्या संख्येने लॉंग मार्च निघणे हे देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सरकार यांवर कोणता निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. विरोधकांना सरकारवर  नवीन टिकेचं अस्त्र सोडण्यासाठी आयता मुद्दा मिळाला आहे.

आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी लॉंग मार्च नावाचं अस्त्राचा वापर करायचा आणि त्या मागण्या त्या मार्च मुळे पूर्ण करणार असं आश्वासन सरकारने दिल पुन्हा एकदा सरकारने दिलेली आश्वासनांचा विसर पडल्यामुळे पुन्हा एकदा त्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तहान भूक विसरून हजारोच्या संख्येने लॉंग मार्च निघालं आहे। खरंच जगाच्या पाठीवर शेतकऱ्याची अशी अवस्था कुठे झाली नसावी.

या शेतकरी लॉंग मार्च च्या काही मुख्य मागण्या आहेत त्या म्हणजे वनजमिनी कासणाऱ्यांना अपात्र ठरविणे बंद करावे आणि जो जमीन कसत आहे त्याच्या नावावर ती शेतजमीन करावी, जीर्ण झालेल्या सर्व शिधापत्रिका बदलून द्या, एफ.आर.पी कायद्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणी झाल्यानंतर १४ दिवसाच्या आत पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले पाहिजे,विकासाच्या नावावर शेतकऱ्याच्या जमीनी काढून घेण्याचे कटकारस्थान बंद करा. अशा सर्व काही मागण्या घेऊन ७ दिवसानंतर शेतकरी मुंबई मध्ये धडक मारणार आहेत.

Share: