रयत क्रांती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी बचाव आंदोलन

20
0
Share:

*रयत क्रांती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी इस्लामपूर येथे शेतकरी बचाव आंदोलन…

 इस्लामपूर:  रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालय, इस्लामपूर येथे “राज्यव्यापी शेतकरी बचाव आंदोलन” करण्यात आले. रयत क्रांती संघटनेच्या वतीने हे आंदोलन राज्यभर करण्यात आले. वाळवा तालुका तहसीलदार  रवींद्र सबनीस यांना यावेळी निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील शेतकरी अनेक संकटाचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटना आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने व सरकारला पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांच्या समस्या सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती व्यापक अशी बैठक राज्याचे मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री यांनी घेणे अगत्याचे होते. आपत्तीच्या कालखंडापासून शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नसणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून खालील प्रश्नावरती सरकारला वेळोवेळी जाणीव करून देण्याचे काम केलेले आहे. अशा आपत्तीच्या काळात नाईलाजाने रयत क्रांती संघटनेला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे. आता तरी सरकार विचार करेल का?
★ संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतीपंपाचे वीज बिल माफ करावे.
★ गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये बाजार भाव मिळावा.
★ बोगस सोयाबीन बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंचनामे करून भरपाई मिळावी.
★ बेदाण्याला प्रति किलो 200 रुपये बाजार भाव मिळावा.
★कांद्याला प्रतिक्विंटल 500 रुपये अनुदान द्या.
★खाजगी सावकार, बँका, फायनान्स यांच्या सक्तीची वसुलीवरती बंदी घालावी.
★ शेतकऱ्यांना विनाअट तात्काळ पीक कर्ज देण्यात यावे.
★आधारभूत किमतीने कडधान्य, मका व कापूस खरेदी करा अन्यथा भावांतर योजना राबवा.
★ गावोगावी कोविड 19 सेंटर उभा करून ग्रामपंचायत ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून द्या.
★कोविड-19 ने डबघाईला आलेल्या उद्योगांना चालना देऊन रोजगार उपलब्ध करा.
यावेळी वाळवा पंचायत समितीचे विरोधीपक्ष नेते राहुलदादा महाडिक, कपिल ओसवाल, डी.के.पाटील, विनायक निकम, मोहसीन पटवेकर, सर्फराज डाके, बजरंग भोसले, लालसो धुमाळ,किरण उथळे, राजेंद्र पाटील, भानुदास मोटे, जयवंत पाटील, सुनील सावंत, दिनकर पाटील,संदीप फार्णे, स्वप्नील लोहार, हमीद मुलाणी, प्रमोद सुतार, सचिन पाटील, अतुल पाटील, धनाजी हुबाले, संदीप पाटोळे, अभिजित पाटील, दीपक आपटे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Share: