केंद्र शासनाने आणलेल्या विधेयकाला रोखण्यासाठी APMC सुप्रीम कोर्टात लवकरात याचिका दाखल करा ! डॉ. गणेश देवी 

10
0
Share:

नवी मुंबई: केंद्र सरकारने मंजुर केलेल्या कृषी, पणन, आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गणेश देवी यांनी वाशी येथील एपीएमसी मार्केट मध्ये केले.

केंद्र शासनाने आणलेल्या या विधेयकाला राज्य शासनाकडून स्थगिती मिळवली असली. तरी हा कायदा रद्द करण्यासाठी शेतकरी, माथाडी, मापारी, व्यापारी यांनी एकत्र येऊन याला विरोध करणे आवश्यक आहे. तर हा कायदा रद्द करण्यासाठी एपीएमसीने सर्वीच्च न्यायलयात याचिका दाखल करण्याचा डॉ गणेश देवी यांनी मौलिक सल्ला दिला.

केंद सरकारचे विधेयक शेतकरी आणि कामगार विरोधी आहे. त्यांच्या निषेधार्थ राज्यभरात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. वाशी येथील एपीएमसी मार्केट मध्ये संवाद यात्रा झाली. यावेळी डॉ गणेश देवी यांनी वाशी एपीएमसी मार्केट मधील कांदा बटाटा, फळ, भाजी, धान्य व मसाला मार्केट ची पाहणी केली. व्यापारी तसेच माथाडीशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी एपीएमसीचे संचालक तथा आमदार शंशिकात शिंदे, धान्य मार्केटचे संचालक निलेश बिरा,आमदार कपिल पाटील, सुरेखा देवी, एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण,पाचही मार्केटच्या उप सचिव,व्यापारी प्रतिनिधी आदि उपस्थित होते. मार्केट ची पाहणी झाल्यांनतर कांदा बटाटा मार्केट येथील एपीएमसी प्रशासनाच्या मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डॉ गणेश देवी यांनी केंद्र सरकाराने मंजुर केलेले विधेयक हे एपीएमसी वर हल्ला असल्याचे स्पष्ट केले. तर अडाणी हे अंबानी हे 21 व्या शतकारतील इग्रज असून भाजपा सरकार हे त्यांच्या हातामध्ये देश देत असल्याचे दिसून येत आहे. एपीएमसी मार्केट ची लढाई हे देशाची लढाई आहे. त्यामुळे सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे. तर एपीएमसी ने देखील शेतकºयांची जवाबदारी घेऊन कंपन्याच्या विरोधात लढणे आवश्यक आहे. राज्य शासनाने या विधेयकाला जरी स्थगिती दिली असली तरी या विधेयकांच्या विरोधात सर्वीच्च न्यालयात याचिका दाखल करणे आवश्यक आहे. ही याचिका एपीएमसीच करु शकते. त्यामुळे त्यांनी ती लवकरात लवकर करावी असा सल्ला देखील डॉ देवी यांनी दिला. तर या कायद्यााला विरोध करणेच हे राज्यकत्र्याच्याच हिताचे आहे असे म्हणाले.

Share: