अखेर पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात

23
0
Share:

खुद्द शरद पवारांनी माढा लोकसभा मतदार संघातून आपली जाहीर झालेली उमेदवारी मागे घेतली याला कारण होत की एकाच परिवारातले तीन जण निवडणुका कसे लढवणार म्हणजेच सुप्रिया सुळे,शरद पवार आणि पार्थ पवार हे कारण सांगून पवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि नातू पार्थ पवार यांना पाठींबा दिला.
पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहे त्यांच्यापुढे युतीच कडवं आव्हान असणार आहे सेनेचे श्रीरंग बारणे हे तिथंचे उमेदवार आहे या दोघांची थेट लढत आपल्याला या मतदार संघात बघायला मिळणार आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघ संपूर्ण फिरत आहे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे स्थानिक नेत्याची भेट घेणे आज त्यांनी एकविरा देवीच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते. पार्थ पवार हे अजित पवार यांचे सुपुत्र आहेत त्यामुळे अजित पवार देखील स्वतःच या निवडणुकीत प्रचाराला उतरले आहे आज अजित पवार यांनी पनवेल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली तसेच शेकाप च्या कार्यकर्ता मेळाव्याला देखील उपस्थित होते या मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार आज म्हणले की, राष्ट्रवादी आणि शेकापचे विचार काही वेगळे नाहीत गेल्या पाच वर्षात भाजपच्या सरकार मध्ये शेतकरी कामगार पक्षांचा भ्रमनिरास झाला आहे. महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. या सरकारच्या काळात कागज चोरीला जातात. एवढ्या बंदोबस्तात कशी काय फाइल चोरीला गेली? हा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.48 उमेदवार देत असताना आघाडी तर्फे तरुणांना देखील प्राधान्य, अप्रत्यक्ष पार्थ पवार च्या उमेदवारी संदर्भात वक्तव्य केलं.
चौकीदार चोर है म्हणतात ते खरं वाटतेय आत्ता मला. समोरच उमेदवार कमजोर म्हणून गाफील राहू नका, मागच्या विधानसभेत आपण गाफील राहिलात.
कदाचित उमेदवार नवखा येईल, नवखा आला तर सांभाळून घ्या.. अजित पवारांची शेकाप कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं शेतकरी कामगार पक्ष हा शब्दाचा पक्का आहे आम्हाला लोकसभेसाठी सांभाळा आम्ही तुम्हांला विधानसभे साठी सांभाळू असे देखील अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले

Share: