खाद्यतेलाच्या तुटवड्याने दर भडकले

अनलॉक नंतर मागणीच्या प्रमाणात पुरवठा कामी झाल्याने तेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने सामान्य नागरिकांना भाव वाढीचा फटका बसत आहे
देशामध्ये जवळपास 70 ते 80 टक्के तेल आयात केले जाते. या मध्ये सुर्यफुलाचे तेल युक्रेन रशिया या देशांमध्ये आयात केले जाते. मात्र या वर्षी युक्रेन मध्ये पीक खराब झाल्याने व रशिया मध्ये सुर्यफुलाच्यापिकांची कमतरता व निर्यात दर वाढल्याचा फटका तेलाच्या भाव वाढीला झाला. सोयाबीनचे तेल अर्जेंटिना तुन आयात केले जाते तेथील कामगार संघटनांनी बंद पुकाराचा परिणाम झाल्याचे दिसून येते .
पाम तेलाची आयात मलेशियातुन केली जाते सूर्यफूल आली सोयाबीन या दोन्ही तेलाचे भाव वाढविण्यात आले या अगोदर एवढी प्रचंड प्रमाणात भाव वाढ झाली नसल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले.
वर्षभरात झालेले भाववाढ (15 लिटर साठी )
तेलाचे प्रकार जानेवारी 2020 जानेवारी2021
सूर्यफूल 1420 ते 1480 1980 ते 2040
सोयाबीन 1380 ते 1430 1780ते 1820
पाम 1380 ते 1430 1780 ते 1820