४५ लाख रुपयांचे खोबरे आणि विलायची जप्त एफडीएची कारवाई

5
0
Share:

विनापरवाना घाऊक व्यापार आणि निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री करीत असल्याच्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शुक्रवारी अमरावती रोड, वडधामना येथील जय बजरंगबली एन्टरप्राईजेस या वितरकाच्या गोडाऊनची तपासणी करून ४५ लाख ४३ हजार रुपयांचा साठा जप्त केला.
रामकृपाल चंद्रभान सिंग असे पेढीचे मालक असूनत्यांनी विक्रीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेतला आहे. भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून ४१ लाख १४ हजार ११४ रुपये किमतीचे २३,९९८ किलो खोबरे आणि ४ लाख २९ हजार ३४० रुपये किमतीची १०४८ किलो विलायची असा एकूण ४५ लाख ४३ हजार ४५४ रुपये किमतीचा साठा कायद्यानुसार सिंग यांच्या गोडावूनमध्ये जप्त करून सीलबंद करण्यात आला. या साठ्यातून दोन नमुने विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अन्न व्यवसाय चालकावर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Share: