मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये फळांच्या किंमतीत घसरण

नवी मुंबई: मुंबई एपीएमसी फळमार्केट मध्ये 300 गाड्यांची आवक झाली असून फळांचे दरात घसरण झाली आहे ग्राहक नसल्याने मालाची उठाव नाही.आज बाजारात संत्रीच्या आवक वाढली असून संत्री 5000 क्विंटल ,सफरचंद 1000 क्विंटल, कलिंगड 3000 क्विंटल ,अननस 1200 क्विंटल, द्राक्ष 450 क्विंटल दाखल झाली आहे.
फळमार्केट मध्ये सफरचंद 80 ते 90,रुपये, डाळिंब 75 ते 150,संत्री 20 ते 25, द्राक्ष 60 ते 80,अननस 24 ते 30 ,पपई 14 ते 16 ,कलिंगड 5 ते 7 रुपये अंजीर 60 ते 75 चिकू 20ते 25 प्रतिकिलोने विकली जात आहेत.मार्गशीर्ष महिन्यापासून फळांचे आवक जास्त असतो आणि ग्राहकांची वर्दळपण असतो मात्र सध्या बाजार आवारात आवक वाढल्याने फळांच्या दरात घसरण झाली आहे . अतिवृष्टीमुळे बऱ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होत. त्यामुळे फळांच्या किंमतींनी सणासुदीच्या काळात आसमान गाठले होते. मात्र आता फळांच्या किंमतीत घसरण झाली आहे.बाजार आवारात संत्र्याच्या आवक जास्त झाल्याने पूर्ण मार्केटमध्ये संत्री दिसून येत आहे ,संतरायची दारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून 20 ते 25 रुपये किलोदराने बिकला जात आहे तसेच 130 रुपये किलो दराने विकला जाणारा सफरचंद सध्या बाजारात 60 ते 70 रुपये दराने विकला जात आहे. डाळिंब 70 ते 150 रुपये,अननस 20 ते 30,द्राक्ष 60 ते 80,कलिंगड 5 ते 8 रुपये ,पपई 10 ते 15 रुपये विकली जात आहे. व्यपाऱ्याने सांगितले कि, शेतकऱ्यांच्या आंदोलन मुळे दिल्ली आणि पंजाव मध्ये जाणाऱ्या संत्री बंद झालं त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आवक वाढली आहे , त्यामुळे आता सर्वसामान्यांनादेखील सफरचंद आणि संत्राची चव घेऊ शकतो. मात्र किरकोळ बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने फळांचे भाव वाढून ते विकले जात आहेत. त्यामुळे दरवाढीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागणार आहे.