नवरात्रीच्या सणासुदीला मुंबई एपीएमसी फळ बाजारात फळांच्या किंमतीत १० ते १५ टक्क्यांनी दर वाढ

24
0
Share:
नवी मुंबई: सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या किशाला कात्री बसणार आहे. कारण पुन्हा एकदा फळांच्या किंमतींनी आसमान गाठला आहे.(Fruit prices rise by 10 to 15 per cent at Mumbai APMC Fruit Market for Navratri)
अतिवृष्टीमुळे बऱ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मग ते फळ असो किंवा भाजीपाला. अतिवृष्टीने सगळं अगदी बिघडून गेलं आहे. नुकसान होऊन आता त्यात बाहेर म्हणून दरवाढ सुद्धा झाली.
ऐन नवरात्रीच्या सणासुदीला मुंबई एपीएमसी फळ बाजारात फळांच्या किंमतीत १० ते १५ टक्क्यांनी दर वाढ झाली असून किरकोळ बाजारात 30 टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. सफरचंद ९० ते १००, मोसंबी ४५, संत्री ४०, सीताफळ ४० रुपये किलोने विकला जात असून पेरु ४०, चिकू ४०, पपई ३५, अननस ३५ ते ४०, खरभुज ४५, डाळिंब १००, कलिंगड २५ रुपये किलोने विकला जात आहे. तसेच फळ बाजारात आज 210 गाड्यांची आवक झाली आहे.
किरकोळ बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने फळांचे भाव वाढून ते विकले जात आहेत. त्यातच अतिवृष्टीमुळे आवक कमी असल्याने अजून दरवाढीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागणार असून काही दिवस दरवाढ हे तेजितच राहील अशी माहिती फळ मार्केटच्या उपसचिव ईश्वर मसराम यांनी सांगितले.(Fruit prices rise by 10 to 15 per cent at Mumbai APMC Fruit Market for Navratri)
Share: