Apmc News exclusive:गणेश नाईकांचे भाजपत मेगा-प्रवेश साठी वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे जैय्यत तयारी

24
0
Share:

नवी मुंबई:आपल्या 55 नगरसेवकांसह गणेश नाईकांचे भाजपत मेगा-प्रवेश साठी नवी मुंबईच्या वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे जैय्यत तयारी चालू आहे. मंगलवारी संध्याकाली या एक्झिबिशन सेंटरमध्ये गणेश नाईक आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव व माजी खासदार संजीव नाईक हे स्वतः समारंभाची सर्व तयारीचे निरीक्षण करत होते. त्यांच्या सोबत राकांपाचे अनेक पदाधिकारीपण सोबत होते. या सेंटरमध्ये उद्या संध्याकाळी 5 वाजता मोठे समारंभात गणेश नाईक, संजीव नाईक आणि त्यांचे समर्थक 55 नगरसेवकांचे मेगा-प्रवेश होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, राज्याचे भाजप प्रमुख चंद्रकांत दादा पाटील, रायगड जिल्हा पालकमंत्री रविंद्र गायकवाड आणि भाजपचे इतर मातब्बर नेते हजर राहणार आहे. समारंभ स्थलांची सुरक्षा पाहणी आणि नियोजनासाठी नवी मुंबई पोलिसांचे अनेक पथक या एक्झिबिशन सेंटरवर हजर झाले आहे आणि संपूर्ण सेंटर क्षेत्र आपल्या ताब्यात घेतले आहे. मेगा-प्रवेशाच्या वेळी अनेक पाहुणे आणि सामान्य पब्लिक पण हजर राहणार आहे. त्यांचे साठी सभागृहात 3,500 खुर्च्या ठेवण्यात आले आहे.

Share: