मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात लसणाचे भाव 50 ते 60 रुपये घसरले

24
0
Share:

मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात लसणाचे भाव 50 ते 60 रुपये घसरले

माघील आठवड्यात लसणाचे भाव 150 ते 200 रुपये होता

नवी मुंबई:मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये माघील आठवड्यात लसणाचे भाव 150 ते 200 रुपये होता मात्र या आठवड्यातील लसणाचे दर हे100 ते 150 रुपये किलो झाला आहे बाजारात नवीन लसणाची आवक सुरू झाल्याने हे दर येत्या काही दिवसात आणखी खाली येण्याची दाट शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे .वाशीच्या घाऊक बाजारात दररोज 10 ते 14 गाड्या येत असतात.इतकी आवक मुंबई आणि उपनगर मधील लसणाची मागणी पूर्ण करण्यासाठी मुबलक आहे.आवक कमी झाली की दरवाढ सुरू होते ,हे बाजारातील सर्व सामान्य गणित आहे पावसामुळे लसणाची आवक कमी झाली होती त्यामुळे लसणाचे नुकसानही काहीप्रमाणात झाले होते.त्यामुळे बाजारात लसणाच्या 5ते6 किंवा 6ते 7 गाड्याच येत आहेत परिनामी दरवाढ सुरू झाली आणि हे लसणाचे दर किलोमाघ्ये 200 रुपयांपर्यत गेले आणि आता हे दर हळूहळू किलोमाघ्ये 10 रुपयांनी कमी होऊन 100ते 150 रुपये किलो झाला आहे अत्ता बाजारात नवीन लसणाची आवक सुरू झाली असून ही आवक हळूहळू वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे आवक वाढली की ,हे दर स्थिर होतील अशी माहिती घाऊक व्यापाऱ्यांनी दिली आहे .

Share: