नांदेड मध्ये जिरेनियम तेलाचा पारंपारिक शेतीपेक्षा वेगळा मार्ग

Share:

नांदेड: राज्यातील शेतकरी पारंपारिक शेतीपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारातना दिसत आहेत. जिरेनियम शेतीतून कृषी अधिकाऱ्यांना आशा नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आता नवनवीन पिकांची लागवड करत आहेत. सोयाबीन, मूग, उडीद आणि इतर पीक घेतल्यानं उत्पादनात घट होत आहे. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिरेनियम पिकाची लागवड सुरु केली आहे. प्रक्रिया केंद्र उभं करुन जिरेनियम या वनस्पतीच्या पानांपासून तेल काढलं जाते.
जिरेनियमच्या तेलाला 12 ते 14 हजारांपर्यंत भाव मिळतो. एकरी 10 ते 15 किलो तेलाचं उत्पादन करता येते. साधारणता शेतकऱ्यांना दीड ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळतं, जिरेनियमच्या तेलाचा वापर सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर, परफ्युम तयार करण्यासाठी केला जातो. शेतकऱ्यांनी गटानं एकत्रित येऊन उत्पादन घेतलं तर शेतकऱ्यांना फायदा होतो. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांनी कंपन्यांशी लेखी करार केला पाहिजे. कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. हा प्रकल्प जर यशस्वी झाला तर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवता येईल. सुगंधी वस्तूंची मागणी पाहता जिरेनियम शेतीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला मार्ग उपलब्ध होऊ शकतो, असे रमेश चलवदे यांनी सांगितले आहे.
विठ्ठल चिंतलवार यांनी जिरेनियम शेतीचा एक व्हिडीओ युट्युबवर पाहिला. त्यानंतर अहमदनगरमध्ये जिरेनियम शेतीचा प्लँट पाहिला. पहिल्यांदा जिरेनियमचा प्लँट आवडल्यानं दुसऱ्यांदा माहिती घेतली आणि जिरेनियमची लागवड करण्याचा निर्णय घेतला. जिरेनियमची लागवड करण्यासाठी विठ्ठल चिंतलवार यांना लागवड,ड्रीप आणि खते यासाठी एकरी 1 लाख रुपये खर्च आला. या पिकावर फवारणी करण्याचा खर्च येत नाही. प्राणी देखील या वनस्पतीचं नुकसान करत नसल्याचं विठ्ठल चिंतलवार यांनी सांगितलेय.

Share: