दिलासादायक बातमी: कांदा बटाटा मार्केटमध्ये 23 सार्वजनिक सुट्या रद्द,वर्षात 7 सुट्या होणार

20
0
Share:

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये गेल्या 10 वर्षांपासून प्रतिवर्षी सार्वजनिक 23 सुट्या मिळत होत्या पण आता होणार नाही आता 23 सुट्ट्या रद्द करण्यात आली असून आता वर्षात 7 सुट्टी देण्याची घोषणा करण्यात आली त्यामुळे कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापारी,माथाडी कामगार व वाहतूकदार खुश झाले आहेत सुट्ट्या मुळे व्यापाऱ्या वरोवर माथाडी कामगाराला मोठा प्रमाणात नुकसान सहन करावा लागत होता.(23 public holidays canceled in onion potato market, 7 holidays a year)
कांदा बटाटा आडत व्यापारी संघटना तर्फे महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी सोबत कार्यालयात एक बैठक पार पडली याबैठकीत वर्षात होणाऱ्या सार्वजनिक 23 सुट्ट्यावर चर्चा करण्यात आला या चर्चेला सार्वजनिक सुट्टी कमी करून 7 सुट्टी जाहीर करण्यात आला मात्र या बैठकीत ठराविक व्यापाऱ्याना बोलावण्यात आले आहे त्यामूळे वऱ्याच व्यापारी नाराज झाली आहे.काही व्यापाऱ्यानी सांगितले की मार्केटमध्ये कुठल्याही निर्णय घेण्यात पूर्वी सगळे व्यापाऱ्याना बोलवले पाहिजे होते मात्र “चोरी चोरी चुपके चुपके” सगळे काम होयला सुरुवात झाली आहे .

कांदा बटाटा व लसूण मार्केटमध्ये प्रति वर्षी 23 दिवस सुट्ट्या या ठरलेल्या असायच्या.यामुळे व्यापारांचे खूप नुकसान होत होते,दर दिवसात मार्केटमध्ये 150 ते 200 गाड्याची आवक असते तो माल शिल्लक राहिला तर तो सडून जायचा त्यामुळे नाईलाजाने माल ग्राहकांना मागेल त्या भावात विकावा लागत असे किंवा फेकून द्यावे लागत होते.पण आता मात्र असे काहीही करावे लागणार नाही.या निर्णयामुळे व्यापारी , माथाडी कामगार व वाहतूकदार यांना दिलासा मिळाला आहे.26 जानेवारी,1मे,15 ऑगस्ट,25सप्टेंबर,23 मार्च, अनंत चतुर्थी, व धुलीवंदन या सणादिवशी कांदा बटाटा व लसूण मार्केटमधील व्यापाऱ्यांना सुट्टी या 7 दिवशी सुट्टी मिळेल,बाजार आवारातील कामकाज पूर्णपणे बंद राहील.या व्यतिरिक्त कोणत्याही सार्वजनिक सुट्ट्या मिळणार नाही अशे निर्णय घेण्यात आला आहे.

Share: