सर्वसामान्यांसाठी खुशखबर; मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे आवक वाढल्याने दरात स्थिरता

22
0
Share:
नवी मुंबई:परतीच्या पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. तसेच मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात गेल्या दोन दिवसांपासून आवक कमी असल्याने भाजीपाल्याच्या किंमतीत दरवाढ झाली होती. मात्र सर्वसामान्य आता सुटकेचा श्वास घेऊ शकतात. घाऊक बाजारात आज 627 गाड्यांची आवक झाली असून. भाज्यांच्या दरात घसरण झाली असून भाज्यांचे दर हे पुन्हा स्थिर झाले आहेत. पुणे ,नाशिक,नगर,कर्नाटक,गुजरात,जळगाव,लातूर या सर्व ठिकाणांहून आज गाड्यांची आवक मोठया प्रमाणावर झाली आहे अशी माहिती भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली आहे.
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाऊनमुळे 300 ते 400 वाहनांची आवक होत होती. परंतु आज जवळपास 8 महिन्यांनंतर आज एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 627 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. तर आज भाज्यांच्या किंमतीत किती घसरण झाली आहे हे आपण जाणून घेऊया
काकडी 20ते 25 रु किलो
मिरची 35 ते 45 रु किलो
शिमला मिरची 40 ते 60 रु किलो                  
भेंडी – 25 ते 35 रु
गवार -50 ते 60 रु किलो
कोबी-20 ते 30 रु किलो
फरसबी-45 ते 55 रु किलो विकला जात असून 
शेवगा-50 ते 60 रु किलो
रताळे-25 ते 30 रु किलो
कोथिंबीर-40 ते 60 जुडी
मेथी-15 ते 25 जुडी
वाटाणा-100 ते 140 रु किलो
टोमॅटो-20 ते 30 रु किलो विकला जात आहे. 
आता भाज्यांच्या किंमतीत जी घसरण झाली आहे दिवाळी पर्यंत आशेच राहणार अशी माहिती भाजीपाला मार्केटच्या संचालक  शंकर पिंगळे यांनी सांगितले.
-शंकर पिंगळे-संचालक -भाजीपाला मार्केट
Share: