खुशखबर: Mumbai एपीएमसीची दिवाळी भेट; कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त १२ टक्के बोनस जाहीर

10
0
Share:

नवी मुंबई : कोरोनाकाळात अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे यंदा दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश सर्वांच्याच मनात उपस्थित होता. हातात पुरेसे पैसे नाही त्यात कोरोनामुळे झालेली पगारातील कपात त्यामुळे यंदा दिवाळीचा बोनस तरी मिळणार की नाही याच विचारात सर्वे असताना एपीएमसी संचालक मंडळाने एपीएमसीमधील पाचही मार्केटमध्ये काम करणाऱ्या एकूण ३५० कर्मचारी व अधिकाऱ्यांना १२ टक्के दिवाळीचा बोनस दिला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ आहे. भाजीपाला, कांदा-बटाटा, फळ, धान्य व मसाला असे पाच मार्केट यात समाविष्ट असून या पाचही मार्केटमध्ये एकूण ३५० कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. कोरोनाने सर्वांच्याच पोटावर पाय ठेवला त्यामुळे बरेच सण हे सध्या पद्धतीने साजरे करावे लागले. तसेच अनेक कंपन्यांनी पगार कपात केली असून दिवाळीदेखील सध्या पद्धतीने साजरी करावी लागणार का ? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात होता. मंगळवारी एपीएमसी संचालक मंडळाच्या बैठकीत एपीएमसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना १२ टक्के बोनस देण्याचा निर्णय एपीएमसी सभापती अशोक डक यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एपीएमसी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे आभार मानत १२ टक्के बोनस देण्याचा निर्णय एपीएमसी संचालक मंडळाच्या बैठकीत एपीएमसी सभापती अशोक डाक यांनी जाहीर केला.

Share: