दुधावरचं थकीत अनुदान सरकार देणार अनुपकुमार यांची माहिती;विधिमंडळाच्या मान्यतेनंतर वितरण

7
0
Share:

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रु प्रति लिटरमागे अनुदान देण्याच्या योजनेअंतर्गत थकीत अनुदान वितरणासाठी निधीची तरतूद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या मान्यतेनंतर हा निधी वितरित करण्यात येईल असे राज्याचे दुग्धविकास व मत्स्यसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी काल सांगितले.
दुधाला रास्त भाव देण्यासाठी सरकारने दुधसंघासाठी प्रतिलिटर ५ रु अनुदान देण्याची योजना दोन टप्प्यात राबवण्यात अली होती. प्रत्येक टप्पा हा ३ महिने कालावधीचा ठरवण्यात आला होता.त्यानुसार ३१ जानेवारी २०१९ रोजी दुसरा टप्पा संपला असे अनुपकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

Share: