Corona Breaking :मुंबई एपीएमसी धान्य मार्केट येथुन 2 कोटी रुपयांचा कडधान्यांचा साठा जप्त

30
0
Share:

राज्याचे वैधमापन शास्त्र व दक्षता विभागाने केलेल्या कारवाईत मुंबई एपीएमसी धान्य मार्केट येथे साठा करणाऱ्या व्यापाऱ्यावर छापा मारून 2 कोटी रुपयांचा कडधान्यांचा साठा जप्त .

मुंबई एपीएमसी बाजारसमितीचा दक्षता पथकाच्या साहाय्याने व्यपारी एमआयडीसी मध्ये धान्यच साठा करत आहेत .

नवी मुंबई-कोरोनाच्या साथीमुळे देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा फायदा उठवत एकाचवेळी शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक करण्याचा नवा उद्योग काही व्यापाऱ्यांनी सुरु केला होता.धान्य मार्केटमध्ये काही व्यापारी कोरोनाचा फायदा घेऊन बाजारात मोठ्या प्रमाणात धान्य, डाळी मागवत होते आणि भाव वाढबून विक्री करत होते .लॉकडाऊन पूर्वी मुंबई एपीएमसी दाना मार्केटमध्ये 70 रुपये दराने विकल्या जाणाऱ्या तूरडाळ, चना डाळ आता 90 ते 105 रुपये दराने विकले जात आहे. 90 रुपये दराने विकली जाणारी मुगडाळ 125 रुपये दराने विकली जात होते.

त्यामुळे व्यापाऱ्यांकडून होणारी ही लूटमारची बातमी Apmc News ने सात दिवसांपूर्वी दिली होती त्याचा दखल घेऊन आज वाशी एपीएमसी धान्य मार्केट मध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्या आणि त्यांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार राज्याचे वैधमापन शास्त्र व दक्षता विभागाने केलेल्या कारवाईत मुंबई एपीएमसी धान्य मार्केट येथे साठा करणाऱ्या व्यापाऱ्यावर छापा मारून 2 कोटी रुपयांचा कडधान्यांचा साठा जप्त केला असून राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असून राज्यात कुठे असे प्रकार होत असतील तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सात वर्षाची कठोर शिक्षा सुद्धा होऊ शकते.


एपीएमसी मार्केट मध्ये करण्यात आलेल्या सदर तपासणीमध्ये बाजार व गोदामांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ताज ऍग्रो कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड टी टी सी इंडिया एरिया पावणे नवी मुंबई व वसवाल राधेशाम भंडारी टी टी सी इंडिया एरिया पावने नवी मुंबई या आयातदारांनी आयात केलेल्या आवेष्टित वस्तूवर नियमानुसार उद्घोषणा नमूद केलेल्या नसल्यामुळे वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ च्या कलम १८-१/३६-१व त्याअंतर्गत वैधमापन शास्त्र आवेष्टित नियम २०११ मधील नियम६-१,६-२ अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईत एकूण दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाई कोकण विभागाचे उपनियंत्रक वैधमापन शास्त्र डॉ.खारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्याचे वैधमापन शास्त्र सहायक नियंत्रक सी.सा.कदम, निरीक्षक सु.रो कुटे, रा. गु सपकाळ यांनी केली आहे.पूर्ण कारवाई मध्ये 20 ते 25 अधिकारी व कर्मचारीयाचा समावेेेश होता.
धान्य मार्केट मध्ये साधारणपणे 200 ते 250 गाड्याची आवक व जावक असतात ,15 दिवसापासून बाजारात विविध राज्यातून 4 ते 5 हजार ट्रक बाजार आवारात दाखल झाले होते. आता पर्यंत 3 लाख मेट्रिक टन धान्य व डाळी मुंबई व उपनगरात गेले आहे सध्या बाजार आवारात 2 ते अडीच लाख टन डाळी व धान्य आहे मात्र मुंबई मध्ये नागरिकांना धान्य व डाळी मिळत नव्हती त्याचा उदाहरण आज अन्न पुरवठा विभागाने मारलेले छापा मध्ये आढळून आले आहेत ,सूत्राने सांगितले प्रमाणे तुर्भे एमआयडीसी, पावणे व म्हापे मध्ये असे बऱ्याच कोल्ड स्टोरेज आहे त्यामध्ये मोठा प्रमाणात साठा करण्यात आली आहे .

-मुंबई एपीएमसीचे दक्षता पथकाना कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती या मध्ये असे दिसून येत आहे की बाजार समितीचे दक्षता पथकाची सहमतीने एमआयडीसी मध्ये व्यापारी मोठ्या प्रमाणात शेतमाल साठा करतात आणि कोरना सारखा असे महामारी मध्ये दरे वाढबून विक्री करतात.

-राज्यात जीवनावश्यक वस्तूंसह सॅनीटायझर मास्कची साठेबाजी करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सर्वत्र अशा कारवाया सुरू असून साठेबाजी करणारे आणि चढ्या किंमतीने विकणाऱ्या व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येत असून यामध्ये त्यांना सात वर्षाची शिक्षा सुद्धा होऊ शकते.

-छगन भुजबळ,मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

Share: