हिरव्या मिरचीच्या दरात घसरण

6
0
Share:
नवी मुंबई :पावसामुळे बाजारात भाज्यांची मोठया प्रमाणात कमतरता जाणवत असली तरी हिरव्या मिरची ची आवक मात्र वाढली आहे. त्यामुळे बाजारात सद्या  चांगल्या प्रकारची हिरवी मिरची येत असून तिचे दर हि घसरले आहेत. त्यामुले ४०  ते ४५  रु किलो पर्यंत असलेली हिरवी मिरची सद्या  घाऊक बाजारात १५ येत २० रु किलोचं घरात आली आहे.  पुढच्या महिनाभर तरी हे दर वाढनार  नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
घावूक बाजारात  २० ते २५   रुपये किलो असणारी हिरवी मिरची ४० ते ४५  रु किलो झाली होती. त्यामुळे हिरव्या मिरचीचा तिखट पणा सर्वानाच झोम्बयाला लागला होता. मात्र आत्ता  हिरवी  मिरची १५ ते २०  रु किलो झाली आहे . त्यामुळे सर्वांनाच आत्ता दिलासा मिळाला आहे.
 
मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती मध्ये दररोज सरासरी  दोनशे क्विंटल  हिरव्या मिरचीची गरज भासते.यातूनच मिरचीची निर्यात हि केली जाते  हि गरज पूर्ण करण्यासाठी आंध्र प्रदेशकर्नाटक , आणि बुलढाणा , नाशिक मधून हिरव्या मिरच्या बाजारात येतात. पावसा व्यतिरिक्त हंगामात पालघर मधूनही मिरच्या बाजारात येतात. त्यामुळे मुंबई बाजाराची गरज पूर्ण होते . 
मात्र मधल्या काळात  काळात मिरची ची आवक अर्ध्यावर आली होती. पावसामुळे बाजारात माल पोहचत नव्हता. म्हणून मालाची कमी होतीच .  मात्र आता बाजारात माल कमी येत असला तरी निर्यात हि थंडावली आहे.  मिरचीची निर्यात कमी झाली आहे. कारण भाजीपाला कमी असल्याने भाजीपाला कमी निर्यात होतो आणि मिरची त्याच्याच बरोबर निर्यात केली जाते. सध्या गुजरात ,मधूनही काही प्रमाणात हिरवी मिरची येत आहे. त्यामुले  बाजारात मिरची मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे मिरचीचे दर खाली आले आहेत .
Share: