नवी मुंबई जुन्या वाहनांना हरित कर वसूल

18
0
Share:

नवी मुंबई जुन्या वाहनांना हरित कर वसूल

नवी मुंबई शहरात 15 वर्षांपासून अधिक काळ वापरत असलेल्या जुन्या वाहनांना हरित कर वसूल करण्यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने मिळून सुरू केले आहे या मोहिमे अंतर्गत येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत ज्या वाहनांचा हरित कर थकीत आहे अशा वाहन धारकांना आपल्या कराचा भरणा त्वरित करण्याचे आव्हान rto विभागामार्फत करण्यात आलेल आहे अन्यथा 1 डिसेंबर पासून rto धारकांच्या भरारी पथकाद्वारे या जुन्या वाहनांचा शोध घेऊन ती जप्त करण्याची करावी केली जाणार असल्याची माहिती नवी मुंबई चे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिली
Rto कडून कराच्या माध्यमातून महसुलीउतपन्न वाढीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे वाहन नोंदणी झाल्यास 15 वर्षानंतर ( rto टॅक्स संपल्यानंतर ) खाजगी वाहन धारकांना वाहन रस्त्यावर चालवायचे असल्यास शासनाकडे हरित कर भरावा लागतो परंतु90 टक्के खाजगी वाहन चालकांना हरित कर काय असतो याची कल्पना देखील नाही त्यामुळे जे वाहन चालक15 वर्षांहून अधिक कालावधी झालेले खाजगी दुचाकी अथवा 4 चाकी वाहन अध्यापही चालवत आहेत अशा वाहनचालकांनी संबंधित वाहनांचा हरित कर भरला आहे की नाही याची खातरजमा करून घेण्याचे आवाहन rto विभागाने केले आहे हरित कर न भरता वाहने रस्त्यावर चालवत असल्याचे आढळून आल्यास संबंधित वाहन जप्त करण्याची कारवाई rto अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे त्यामुळे शहरातील वाहनधारकांनी येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत हरित कराचा भरणा करावा असे आवाहनही rto अधिकारी वाघुले यांनी केले आहे
15 वर्षाहून अधिक काळ वापरत असलेल्या वाहनांवर हरित कर आकारला जाणार आहे त्यामुळे 1 डिसेंबर पासून अशी वाहने बेकायदा रस्त्यावर चालवल्यास rto विभागाच्या भरारी पथकाद्वारे जप्तीची कारवाई केली जानार आहे.

Share: