Hapus Mango:Mumbai एपीएमसी फळ मार्केटमध्ये स्पेनचा हापूस आंबा दाखल; १० आंब्यांची किंमत ४,५००

19
0
Share:

नवी मुंबई: कोरोना काळात सध्या प्रत्येकजण स्वतःच्या जीवाची काळजी करत आहे. पौष्टिक आहार घेत असून रोजच्या आहारात फळांचा समावेश देखील करत आहे. मात्र सध्या इंपोर्टेड फळांकडे भारतीय लोकांचा कळ जात आहे. भारतीय फळांपेक्षा विदेशी फळांना भारतीय लोकांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे विविध देशातून विक्रीसाठी फळे ही आयात केली जातात.

सध्या मुंबई एपीएमसी फळ बाजारात स्पेनचा हापूस दाखल झाला आहे. या हापूस जर तुम्ही बाजारात विकत घ्यायला गेलात, तर तुम्हाला १० आंब्यांचे ४ हजार ५०० रूपये मोजावे लागतील. याच प्रकारे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वॅाशिंग्टन, साऊथ आफ्रिका, तुर्की, इराण, बेल्जीयम, चायना, कॅलिफोर्निया या सर्व देशातून फळांची आयात केली जाते. ज्यामध्ये स्पेनचा हापूस, किवी, पेर, ब्लु बेरी यांसारख्या बऱ्याच फळांचा समावेश असतो. मात्र या फळांची किंमत ही त्याच प्रकारची असते अर्थात ही फळे अत्यंत महाग असतात.

सध्या बाजारात भारतीय सफरचंद मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. विदेशी फळांच्या तुलनेत भारतीय फळे ही स्वस्त व चवीला उत्तम दर्जाचे असतात. तरीही काही प्रमाणात लोकांची इम्पोर्टेड फळांनाच मागणी असते. तसेच सध्या फळ मार्केटमध्ये इंपोर्टेड सफरचंदाच्या तुलनेत भारतीय सफरचंदाची विक्री ही मोठ्या प्रमाणावत होत आहे.

Share: