आरोग्यदायी पपई: एपीएमसी फळ बाजारात सोलापूरची स्वीट चार्ली नावाची पपई दाखल.

89
0
Share:

सोलापूरची स्वीट चार्ली नावाची पपई ची जात बाजारात दाखल.
-आकर्षक रंग व गोडी यामुळे ग्राहकांची पसंती.

रेश्मा  निवडुंगे-एपीएमसी न्युज

नवी मुंबई: यंदा सोलापूरवरून येणारी नवीन पपईची जात बाजारात दाखल झाली आहे.स्वीट चार्ली असे या पपईच्या प्रकारचे नाव आहे.चवी बरोबर दरही आवाक्यात असल्याने याला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

पपई हे पिवळ्या व लालसर रंगाचे गोड चवीचे फळ आहे.हे फळ पचनास मदत करते व याच्या बिया व गर आरोग्यदायी आहे.रोजच्या जेवणात सॅलाड म्हणून याचा उपयोग केला जातो.
सध्या बाजारात उस्मानाबाद वरून येणाऱ्या पपईची आवक सुरू आहे.याशिवाय तैवान ७८६,७८५ या प्रकारच्या पपई उपलब्ध आहेत.घाऊक बाजरात १०-१२ रु प्रति किलो या दरात या पपई उपलब्ध आहेत तर किरकोळ दर प्रति नग 30 रु असे आहेत.स्वीट चार्ली या नव्याने बाजारात दाखल झालेल्या प्रकाराला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे.चवीला गोड, दिसायला आकर्षक व टिकाऊ या वैशिष्ट्यांमुळे ही पपई ग्राहकांच्या पसंतीस
पडत आहे.रोज २५ गाडी आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.ही पपई घाऊक प्रति किलो २२ रु दरात तर किरकोळ ला प्रति नग ५०-५५ रु दरात उपलब्ध होते,असे पपई चे व्यापारी विकास घार्गे यांनी सांगितले.
आरोग्यदायी फायदे-
१.पोटाचे विकार दूर करण्यासाठी पपई लाभदायी आहे.पचनसंस्था सुरळीत करण्याचे काम यामुळे होते.
२.उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी पपईच्या पानांची भाजी करतात.
३.पपईमुळे त्वचेचे रोग दूर होतात.
४.दररोज पपई खाल्ल्याने उंची वाढते.
५.खरूज आणि गजकर्णावर पपईचा चीक लावला जातो.

Share: