मुसळधार पावसाने उडवली पुणेकरांची झाेप;शहरात सर्वत्र हाहाकार,सहा जणांचा मृत्यू

19
0
Share:

-मुसळधार पावसाने उडवली पुणेकरांची झाेप;शहरात सर्वत्र हाहाकार,सहा जणांचा मृत्यू

-NDRF च्या तीन टीम तैनात,कात्रज मनपा आणि बारामतीत बचावकार्य
-अरणेश्वर भागात सहा जणांचे मृतदेह आढळले
शहरातील विविध भागात जलमय,घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिक त्रस्त
-नागपूर – पुणे मार्ग पेठ गावाजवळ बंद, पैनगंगा नदीला पूर आल्याने मागील 4 तासापासून रस्ता बंद, वाहतूक खोळंबली,

-शेतात पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान,

पुणेः रात्री आठ वाजता सुरु झालेल्या पावसाने शहरात हाहाकार माजवला आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे शहरातील सर्वच भागातील रस्ते जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. रस्त्यावरच्या पाण्यात अनेकांच्या गाड्या बंद पडल्या असून नागरिक आता जीव मुठीत धरुन घराची वाट पकडत आहेत.

शहरातील विविध भागांमधील सद्यस्थिती

– वारजे ब्रिज खाली पाणी घुसले वारजे ते कोथरुड रस्ता बंद.

– सहकारनगर तळजाईला जाणारा रस्ता तेथील नाला फुटल्यामुळे ब्लॉक झाला आहे. गजानन महाराज मठ ते पुढपर्यंत भरपूर पाणी साचले असून गाड्या वाहून जात आहेत.

– कोल्हेवाडी परिसरात देखील दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलंय

– पेठामध्ये रस्त्यावर जागोजागी पाणी साठले आहे. तसेच सोसायटीमध्ये पाणी जमा झाले आहे.

– बाणेर रस्त्यावर सिंध सोसायटी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दोन एक फूट पाण्यातून चारचाकी गाड्याही जाताना बंद पडत आहेत.

*- दांडेकर पूल झोपड पट्टी मधून आंबील ओढ्यातून आलेले पाणी शिरले आहे, पोलीस पाण्यात उतरून लोकांना घरातून सुरक्षीत बाहेर काढत आहेत.*
-नागपूर – पुणे मार्ग पेठ गावाजवळ बंद, पैनगंगा नदीला पूर आल्याने मागील 4 तासापासून रस्ता बंद, वाहतूक खोळंबली, शेतात पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान, काल सायंकाळ पासून जिलह्यात मुसळधार पाऊस झाल्याने पुरस्थिती ..


-बारामती कऱ्हा नदीतील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होणार.. बारामती शहरातून वाहणाऱ्या कऱ्हा नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन.. पाणी ओसरेपर्यंत स्थलांतर करण्याचं प्रांताधिकाऱ्याचं आवाहन..

काल झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना गुरुवारी दि. 26 सप्टेंबर, 2019 रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.
– बालाजीनगर, संतोषनगर, कात्रज, आंबेगाव खुर्द अत्यन्त गंभीर परिस्थिती, कात्रज बोगदा परिसर दरड कोसळली, आनेक ठिकाणी गाड्या वाहून गेल्या,   पहिल्या मजल्या पर्यंत पाणी भरले आहे.
अतिवृष्टीमुळे 5 तालुक्यातील शाळा, महाविद्यालये यांना
26 सप्टेंबर रोजी सुट्टी
– जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे शहर व परिसरात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.  आम्ही महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तरी कृपया नागरिकांनी काळजी करू नये तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.  याच बरोबर  कुणाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क करावा.

-मुक्ता टिळक, महापौर, पुणे

म.न.पा आपत्कालीन कक्ष – ९६८९९३१५११

Share: