मुंबईला केले हायअलर्ट! 9 तासांतच 300 मिली मिटर पाऊस, 26 जुलैची आठवण करुन देणारी स्थिती.

23
0
Share:

दीपाली बोडवे,एपीएमसी न्युज. कॉम

मुंबईत पावसाने दोन दिवसात मुंबईची तुंबई केली आहे,
माटुंगा, दादर ,वरळी, लालबागमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.पश्चिम उपनगरात वांद्रे ,जोगेश्वरी, अंधेरी, दहिसर,भांडुप, घाटकोपर, ठाण्यात देखील पावसाची जोरदार बँटींग सुरू आहे. तुफान पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची आणि पार्किंगमधील गाड्यांची पडझड झाली आहे.

मुंबईत अवघ्या 5 तासात 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे,
मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. दादर, माटुंगा, सायन, हिंदमाता परिसराला तळ्याचं स्वरुप दिसू लागलं आहे. हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे.जोरदार पावसाने वातावरण इतकं अस्पष्ट झालं आहे की, गाडी चालकांना लाईट लावून गाडी चालवावी लागत आहे.

मुंबई, ठाणे,रायगड, पालघर मध्ये येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.कोकण,गोवा, मुंबई, आणि काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल आहेअनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत,एकूण 25 झाडे कोसल्याच समजतंय.लॉकडाऊन समजून घरी बसण्याची वेळ या वादळी पावसाने आणली आहे.पुढील तीन तासांसाठी मुंबई आणि शहरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

नवी मुंबईमध्ये वाशी,नेरुळ,कोपरखैरणे,ऐरोली,बेलापूर,
तुर्भे ,आणि एपीएमसी भागात पाणी साचले असून,एकूण 30 झाडे कोसळल्याच समजतंय. काही भागात तर मोठ मोठे झाडे कोसळले आहेत.

आता पर्यंत नवी मुंबईत 40 mm पावसाची नोंद झाली आहे.वादळी पावसामुळे डी. वाय .पाटील स्टेडियमचा काही भाग कोसळला आहे यामुळे स्टेडियमला जबरदस्त फटका बसला आहे.पुढील तीन तासात अति मुसळधार पाऊस पडेल,तसेच 100 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे 26 जुलैची आठवण करून देणारी स्थिती निर्माण झाली आहे. कोलाबा वेधशाळेनं दिलेली माहिती अशी की, गेल्या 9 तासांत 229.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहेत.

Share: