कोपरखैरणे रेल्वे स्टेशनच्या हद्दीत सिडकोच्या भूखंडावर झोपड्याचे आक्रमण

5
0
Share:

पालिका म्हणते ही जागा सिडकोचीच.
कोपरखरणे रेल्वे स्थानकालगतच्या सिडकोच्या एका भूखंडावरील झोपडपट्टी कारवाई करीत सिडकोने हटवली, मात्र त्यांनी आता फुटपाथ आणि भूखंडाचे कुंपण या मोकळ्या जागेत आपला संसार थाटला आहे. ते फुटपाथवर झोपत असल्याने दुर्घटनेची शक्यता आहे. असे असताना याकडे कोपरखैरणे अतिक्रमणविरोधी विभाग मात्र डोळेझाक करीत आहे.
मात्र हा भूखंड वगळता त्याला लागून असलेल्या भूखंडावरील झोपडय़ांवर कारवाई केली नव्हती. काही महिन्यांपूर्वी हा भूखंडसुद्धा सिडकोने विकल्यावर या ठिकाणीही बंदोबस्तात कारवाई करीत भूखंड रिकामा केला होता. त्यानंतर कारवाई केलेल्या झोपडपट्टीवासीयांनी फुटपाथ आणि भूखंडाचे कुंपण या मोकळ्या जागेत अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी सुमारे दीड ते दोन फुटांच्या उंचीवर ही वस्ती असली तरीही दोन ठिकाणी पायवाट बनवल्याने रस्त्यालगत आली आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार ते सिडकोच्याच जागेवर आहेत. मात्र यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा राहिली नाही. हा रस्ता कोपरखैरणे स्टेशनसमोर असून रस्ता केवळ पाच मीटरचा आहे. त्यातच ज्या ठिकाणी झोपडय़ा वसल्या त्यांच्या समोर एक मॉल असून त्यात सिनेमागृह, हॉटेल असल्याने या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते. त्यातच या झोपडय़ा तेथे वसल्याने आता पादचाऱ्यांनी चालायचे कुठून? हा प्रश्न निर्माण झाला आहे. झोपडपट्टीवर कारवाई झाल्यापासून या लोकांनी फुटपाथ व्यापला असला तरी त्यावर कोपरखैरणे विभाग कार्यालय कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या ठिकाणीही लवकरच कारवाई करण्यात येईल अशी माहिती सिडको अतिक्रमण विभागाने दिली आहे.
हिरव्या रंगाचा पडदा बांधून ज्या झोपडय़ा बांधल्या गेल्या आहेत, त्या पालिकेच्या जागेवर नसून सिडकोच्या जागेवर आहेत. या बाबत संबंधित प्रशासनाला कळवण्यात आले आहे.

– अशोक मडवी, विभाग अधिकारी कोपरखैरणे

Share: