हैदराबाद एन्काऊंटर/ ‘फैसला ऑन द स्पॉट’ करणारे IPS व्ही सी सज्जनार!

19
0
Share:

हैदराबाद एन्काऊंटर/ ‘फैसला ऑन द स्पॉट’ करणारे IPS व्ही सी सज्जनार!

हैदराबाद-तेलंगणातील गँगरेप आणि हत्येतील आरोपींचा एन्काऊंटर करुन, पोलिसांनी चारही आरोपींचा खात्मा केला. डॉक्टर तरुणी दिशावर (नाव बदलले) 27 नोव्हेंबरला चौघांनी बलात्कार करुन, तिला पेटवून देऊन हत्या केली होती. त्यानंतर आज जवळपास दहा दिवसांनी हैदराबाद पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेलं होतं. पण तिथे आरोपींनी पोलिसांची शस्त्र हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी चारही आरोपींचा खात्मा केला.तेलंगणातील सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांच्या नेतृत्त्वात हे एन्काऊंटर झालं. कडकशिस्तीचा पोलीस अधिकारी म्हणून सज्जनार यांची ख्याती आहे.सज्जनार हे 1996 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलीस सेवेत अनेक धडाकेबाज कारवाया त्यांच्या नावावर आहेत. दीड वर्षीपूर्वीच ते सायबराबादचे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले. हैदराबादेतील त्यांनी केलेला हा पहिलाच एन्काऊंटर नाही.सज्जनार हे एन्काऊंटर मॅन म्हणून ओळखले जातात. 11 वर्षांपूर्वी तेलंगणातील वारंगल महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थिनींवर असिड हल्ला झाला होता. त्यावेळी सज्जनार यांच्या नेतृत्त्वात झालेल्या एन्काऊंटरमध्ये तीनही आरोपींना ठार केलं होतं. 2008 मध्ये हा थरार गाजला होता.महिला सुरक्षेबाबत अत्यंत दक्ष आणि तितकेच कठोर असलेल्या व्ही जे सज्जनार यांची कृती ही ‘फैसला ऑन द स्पॉट’ अशीच आहे. अनेक नक्षलविरोधी कारवायांमध्येही सज्जनार सहभागी होते. सज्जनार यांनी विशेष तपास पथक, पोलीस उपमहानिरीक्षक अशी पदं सांभाळली आहेत. दीड वर्षापूर्वी त्यांची सायराबाद पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली.

Share: