BREAKING| कोरोना काळात इंपोर्टेड फळ व भाज्या खातायं तर सावधान…

15
0
Share:

नवी मुंबई: कोरोना व्हायरस आला आणि संपूर्णजगात लॉकडाऊन सुरु झालं. लॉकडाऊनमध्ये बाहेर जाता येत नसल्याने अनेकांनी जीवनावश्यक वस्तूंची अधिकची खरेदी करण्यास सुरुवात केली. जीवनावश्यक वस्तूंमध्ये काही वस्तू या लवकर खराब होणाऱ्या असतात. उदा. भाजीपाला, दूध, फळ इत्यादी. या वस्तू खराब होऊ नयेत यासाठी त्यांना फ्रिजमध्ये ठेवण्यात येते. परंतु फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तूंवर व त्यावरील पॅकेटवर कोरोना हा जास्त काळ जिवंत राहू शकतो हे आपल्याला माहिती आहे का? अशीच एक घटना सध्या चीनमधील क्विंगदाओत येथे घडली आहे.

प्रत्येक देश हा इतर मित्र देशांकडून कोणत्या ना कोणत्या वस्तू आयात व निर्यात करत असतो. यामध्ये भाजीपाला, फळ, मांस, तर कधी कधी कांदादेखील आयात व निर्यात केला जातो. या आयात व निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू खराब होऊ नयेत यासाठी त्या ‘फ्रोजन फूड’ पद्धतीने पोहोचवले जातात. आता ‘फ्रोजन फूड’ म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. फ्रोजन फूड म्हणजे जे पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते ते पदार्थ एका मोठ्या फ्रिजमधे ठेवून एका देशातून दुसऱ्या देशात जहाज किंवा विमानामार्गे पाठवले जातात.

चीन हा १९ देशातून ५६ कंपन्यांचे फ्रोजन फूडची आयात करत असतो. मात्र क्विंगदाओत येथे एक कोरोना रुग्ण आढळून आल्याची घटना समोर आली असून तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची सांगितले जात आहे. त्यामुळे चीनने सध्या १९ देशातून येणाऱ्या ५६ कंपन्यांचे फ्रोजन फूडची आयात थांबवली आहे. तेथे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

फ्रीजमध्ये थंड करण्यात आलेल्या पदार्थांच्या आवरणावर कोरोनाचे जिवंत विषाणू असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनमधील रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. चीनमधील किनारपट्टी भागात असलेल्या किंगदाओ शहरात हे आढळून आलं आहे. परदेशातून शीतपदार्थ आयात करण्यामुळे कोरोना वाढीचा धोका अधिक असल्याचं चीनकडून सांगण्यात आले आहे. काही देशांमध्ये अशा पदार्थांच्या आवरणांची तपासणी करण्यात आली होती. ज्यात कोरोना विषाणू असल्याचं लक्षात आलं होतं. त्यानंतर इंडोनेशियातील सीफूड आणि ब्राझीलमधील फूडवर चीननं बंदी घातली होती. फ्रोजन फूडच्या संपर्कात आल्याने कोरोना होत नसल्याचेही सांगितले जात आहे. तरीही फर्जन फूड प्रोसेसिंगमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतात देखील हंगामानुसार मोठ्या प्रमाणात इतर देशातून पदार्थांची आयात केली जाते. तसेच इमोपरटेड फळांच्या तुलनेत भारतीय फळे ही उत्तम दर्जाची असूनही इमोपरटेड फळांना भारतीय लोकांची मोठ्या प्रमाणात मागणी असून ही फळ मुंबई एपीएमसी फळ बाजारात विक्रीसाठी आणली जातात. अशी माहिती एपीएमसी फळ मार्केटचे संचालक संजय पानसारे यांनी दिली आहे. त्यामुळे या फळांची आयात देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या भारतात अमेरिका, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, जपान, थायलंड, इराण, अफगाणिस्तान, रशिया यांसारख्या देशातून फळांची आयात केली जाते. ज्यामध्ये सफरचंद, चेरी, पेर, संत्री, सिट्रस, स्ट्रॉबेरी, ब्लू बेरी (करवंद), ड्रॅगन फ्रुट, किवी, पीच फ्रुट यांसारख्या फळांसह भाजीपाल्याची देखील आयात केली जाते. मात्र या सर्व गोष्टी जेव्हा आयात केल्या जातात तेव्हा त्या एका फ्रिजमधून या ठिकाणी आणल्या जातात. त्यामुळे तुम्ही जर फ्रिजमधील वस्तू खात असाल तर जरा जपून कारण, फ्रिजमधे तापमान कमी सल्याने कोरोना व्हायरस जास्त वेळ जिवंत असल्याचा संशोधकांकडून सांगितलं जात आहे. फ्रोजन फूड वर कोरोना हा जास्त वेळ अक्टीव्ह असल्याचा धोकाही आहे. तुम्हांला जर शीत पदार्थ खाण्याची सवय किंवा आवड असेल तर तुमची हीच सवय तुम्हांला अडचणीत टाकू शकते. यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

काय व कशी काळजी घ्याल?

१. फ्रिजमध्ये जे सामान ठेवणार आहात, ते नीट स्वच्छ करा.

२. फ्रिजही नियमित स्वच्छ करा. यासाठी तुम्ही ब्लीचाही वापर करू शकता.

३. काही दिवस थंड पदार्थ खाणे टाळा.

४. हात सतत साबणाने स्वच्छ धुवा.

५. सामानाची डिलीव्हरी थेट घेऊ नका. एका सुरक्षित ठिकाणी सामान ठेवून नीट स्वच्छ करून आत घ्या.

Share: