नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभावामार्फत बर्ड फ्लू आजाराबाबत महत्त्वाच्या सूचना

7
0
Share:

नवी मुंबई- महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यातील पक्षांमध्ये बर्ड फ्लु या आजाराचा विषाणू आढल्याचे प्रयोग शाळा तपासणी मध्ये निश्चित झाले आहे या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगर पालिका कार्य क्षेत्रासाठी आरोग्य विभागामार्फत महत्त्व पूर्ण सुचना देण्यात येत आहेत.

तरी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन आपल्या घरी सर्वेक्षण भेटी करता येणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य ती सत्य महिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महानगर पालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

बर्ड फ्लू आजाराच्या पर्सवभूमीवर आरोग्य विभागामार्फत महत्त्व पूर्ण सूचना-

1)नागरिकांना आपल्या परिसरामध्ये कोंबड्या, कावळा, कबुतर, किंवा इतर पक्षी मृत अवस्थेत आढल्यास त्याची माहिती त्वरित नवी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला टोल फ्री क्रमांक 1800222309 यावर कळविण्यात यावी.

2)महानगरपालिकेकडे प्राप्त माहितीनुसार सदर मृत पक्षाची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल.

3) आजारी पक्षी यांच्या बरोबरचा संपर्क टाळावा.

4)जर कोणत्याही व्यक्ती मध्ये घसा खवखवणे, ताप येणे, सर्दी खोकला अशा प्रकारची इन्फ्लुएन्झा सदृश लक्षणे आढल्यास त्वरित नवी मुंबई महानगरपालिकेच्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी.

5) मांस व अंडी खाताना व्यवस्थित शिजवून खाल्याने कोणत्याही धोका उद्धभवणार नाही याची नोंद घ्यावी.

Share: