एपीएमसी मध्ये भाजीपालाचे व्यापारीला शिरवणे मध्ये गळा चिरून हत्या

7
0
Share:

नवी मुंबईच्या शिरवणे येथे गंगोत्री अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोर वर राहत असलेले अरविंद गुंड या 60 वर्षाच्या भाजीपाला व्यापार्याची हत्या करण्यात आली आहे. मृत अरविंद गुंड हे वारकरी सम्प्रदायाचे होते. त्यांची बायको माहेरी गेली होती आणि आज दुपारी 2 वाजता ते घरी एकटे होते.
याच वेळी त्यांचे नोकर जेवण घेवून त्यांचे घरी आला होता. दाराचे बेल आणि कडी वाजवून सुद्धा घरांचे दार बंद होते. या नंतर त्यांच्या नोकराने अरविंद गुंड यांचे आईटी इंजीनियर असलेले मुलाला फोन करून हा प्रकार सांगितला आणि याच इमारतीत चौथ्या मजलेवर राहत असलेले एका ओळखीच्या व्यक्तिकडे ठेवलेली चावी घेवून परत येवून फ्लैटच्या दार उघडून फ्लैटच्या आत प्रवेश केला. आतमध्ये अरविंद गुंड हे मृत अवस्थेत खाली पडले होते आणि फर्शीवर सर्व ठिकाणी रक्त पसरले होते.
नोकराने लगेच अरविंद गुंडच्या मुलाला ही बातमी कडवून नेरुल पोलिसांना माहिती दिली. या बाबत नेरुल पोलिस तपास करत आहे.

Share: