कोल्हापुरात टोमॅटो ५० ते १७० रुपये प्रतिदहा किलो

29
0
Share:

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोची दीड ते दोन हजार कॅरेट इतकी आवक होती. टोमॅटोस दहा किलोस ५० ते १७० रुपये दर मिळाला. टोमॅटोचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. ओल्या मिरचीची तीनशे ते चारशे पोती आवक होती. ओल्या मिरचीस दहा किलोस २०० ते ५०० रुपये दर होता. ढोबळी मिरचीची तीनशे ते चारशे पोती आवक होती. ढोबळी मिरचीस दहा किलोस १३० ते ४०० रुपये दर होता. भेंडीच्या आवकेत वाढ होती. वांग्याची दोनशे ते तीनशे बॉक्‍स आवक होती. वांग्यास दहा किलोस ५० ते २५० रुपये दर मिळाला.

भेंडीस दहा किलोस १०० ते ४५० रुपये दर मिळाला. वरण्याची चाळीस ते पन्नास पोती आवक होती. वरण्यास दहा किलोस २३० ते ३३० रुपये दर होता. गाजराची दीडशे ते दोनशे पोती आवक होती. गाजराची आवक प्रामुख्याने सांगली भागातून सुरू होती. गाजरास दहा किलोस ५० ते २०० रुपये दर मिळाला. मका कणसास शेकडा २०० ते २५० रुपये दर होता. सांगली जिल्ह्यातून शेवगा शेंगेची आवक होत आहे. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत ती कमी असल्याचे सांगण्यात आले. शेवगा शेंगेस दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर होता

Share: