मुंबई Apmc कांदा बटाटा मार्केटमध्ये कांदा 60 तर बटाटा 35 रुपये किलो

25
0
Share:
नवी मुंबई:अवकाळी पावसाने सर्वत्र नुकसानीचे सत्र सुरूच आहे. त्याचबरोबर विक्रीसाठी मालाची आवक देखील कमी झाली आहे. यायचाच परिणाम हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाला असून घाऊक बाजारात कांद्याची आवक घटली असून दरात वाढ सुरु आहे.
५ दिवसांपूर्वी घाऊक बाजारात कांदा हा ३५ ते ५० रुपयांनी विकला गेला असून किरकोळ बाजारात तो ६० रुपये प्रतिकिलोने विकला गेला. परंतु ५ दिवसांनंतर आज कांदा हा ६० रुपये प्रतिकिलोने घाऊक बाजारात विकला जात असून, किरकोळ बाजारात कांदा शंभरी गाठण्याची शक्यता आहे.
मुंबई एपीएमसीमध्ये आज १०५ गाड्यांची कांदा बटाटा आवक आहे. अवकाळी पावसाचा परिणाम हा कांद्यावर ही झाला आहे. तसेच कांद्यासोबतच बटाटे ही महाग होत आहेत. सध्या घाऊक बाजारात बटाटेही ३० ते ३२ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. मागणी पुरवठा कमी झाल्याने दरवाढ होत आहे. तसेच दिवाळीपर्यंत दरवाढीत अशीच तेजी सुरु राहण्याची माहिती कांदा बटाटा व्यपारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे.
Share: