पंतप्रधान किसान सन्मान योजनेंत गडबड, लाभार्थ्यांच्या अपात्र यादीतील 45 टक्के शेतकरी पात्र नाहीत.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जात आहे.
या योजनेचा लाभ फक्त अशा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ज्यांची एकूण जमीन 2 हेक्टरपर्यंत आहे. यापेक्षा जास्त जमीन असल्यास किंवा शेतकऱ्यावर कर्ज असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासाठीच कृषी मंत्रालयाने अपात्र लाभार्थ्यांच्या दोन श्रेण्या तयार केल्या आहेत. पहिल्या प्रकारामध्ये 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी आणि दुसर्या प्रकारात कर भरणारे शेतकरी असं वर्गीकरण करण्यात आलं आहे.
या योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैशाचा सातवा हप्ता 31 मार्च 2021 पर्यंत ट्रान्सफर करण्यात येणार आहे. अधिक माहितीनुसार, माहिती अधिकारांतर्गत आतापर्यंत तब्बल 20 लाख अपात्र लाभार्थ्यांनी 1364 कोटी रुपयांचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. यासंबंधी कृषी मंत्रालयानेही खुलासा केला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीची घोषणा 2019 मध्ये झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांच्या अपात्र यादीतील 45 टक्के शेतकरी पात्र नाहीत तर 55 टक्के शेतकरी हा करदाता आहे. पण यासाठी सरकार निधी वसूल करेल असा दावा करण्यात आला आहे. या योजनेस पात्र नसलेले बहुतेक शेतकरी हे मुख्य करून महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब आणि आसाममध्ये आहेत. यात सगळयात जास्त पंजाबचे शेतकरी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि सिक्कीममधील फक्त एक शेतकरी या योजनेस पात्र नाही. या योजनेंतर्गत वर्षामध्ये तीन वेळा 2000-2000 रूपयातील तीन शेतकरी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतात.