मुंबई एपीएमसी घाऊक बाजरात इजिप्त व थायलंड कांद्याची आवक भाव  80 रुपयांवर,एका किलो मध्ये तीन कांदे

मुंबई एपीएमसी घाऊक बाजरात इजिप्त व थायलंड कांद्याची आवक भाव  80 रुपयांवर,एका किलो मध्ये तीन कांदे

नवी मुंबई:कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करण्यात आली असून कांद्याचे 100 कंटेनर सध्या जेएनपीटीच्या बंदरात आले आहेत. त्यातील इजिप्त ,थायलँडहून आलेले कांद्याचे 5 कंटेनर सोमवारी बाजारात आले होते. थायलंडहून चार कंटेनर कांदा मुंबई घाऊक बाजारात आला आहे इजिप्त व थायलँड कांद्याची किंमत प्रति किलो 80 रुपये बिकला जात आहे तर महाराष्ट्र आणि गुजरातची कांदा 60 ते 80 रुपये बिकला जात आहे, परदेशात तुन आलेल्या कांदा आणि महाराष्ट्रातील कांद्याची सरासरी भाव एकच दिसून येत आहे ज्यामुळे सर्व समान्य ग्राहक आणि व्यापारी यांचे मत अशे आहे की परदेशातून कांद्याची आयात करण्याची गरज काय, सध्या थायलँड मधून आलेल्या कांद्याची आकार मोठा तसेच एक किलो मध्ये तीन कांदा बसले जातात,

परदेशातून कांदा आपल्याकडे येणे हे काही आत्ता नवीन राहिलेले नाही. या पूर्वीही अनेकदा बाजारात इजिप्त, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान या ठिकाणांहून कांद्याची आवक झाली आहे. त्यामुळे परदेशातील कांदा कसा आहे, हे आत्ता अनेक व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांना कळून चुकले आहे. परदेशातील कांद्याला आपल्या कांद्याची सर नाही. आपल्या कांद्यात असलेला तिखटपणा आणि चव अन्य ठिकाणच्या कांद्याला नाही. त्यामुळे इतर कुठल्याही ठिकाणांहून कांदे आले तरी त्यांना महाराष्ट्रातील कांद्याची सर नाही येत. त्यामुळे आपल्या कडील ग्राहकांना इतर ठिकाणचे कांदे पसंती देत नाहीत.

अशा परिस्थितीमुळे आत्ता आलेल्या या परदेशी कांद्यांना बाजारात उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच आत्ता आपल्याकडील चांगला कांदा 60 ते ते 80 रुपये किलोमध्ये मिळत आहे. तर, हा परदेशी कांदा 70 ते 80 रु. किलोने उपलब्ध आहे. दरामध्ये समान भाव आहे. मात्र हा कांदा जेवणाची चव बिघडवत असल्याने त्याला खरेदीदार मिळत नाहीत. कांद्याची अत्यंत टंचाई असताना हा कांदा विकलाही गेला असता आणि त्याच हिशेबाने हा कांदा मागवला गेला आहे. मात्र हा कांदा मागवल्यानंतर तो येथे येईपर्यंत आपल्याकडे नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे आणि कांद्याची टंचाई बऱ्यापैकी कमी झाली आहे. शिवाय कांद्याचे दर वाढतील म्हणून अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी नेहमीपेक्षा अधिक कांदा बाजारातून खरेदी केला आहे. त्यामुळे बाजारात आत्ता कांद्याची मागणीही कमी झाली आहे.

सोमवारी घाऊक बाजारात आपल्या कांद्याला 40 ते 80 रु. किलोचा दर मिळाला असून कांद्याच्या 125 गाड्यांची आवक झाली आहे. मात्र तरीदेखील कांद्याला हवा तसा उठाव मिळाला नसल्याचे व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.