Independence Day: संपूर्ण देशात स्वातंत्र दिन साजरा होत असताना; मुंबई एपीएमसी भाजीपला मार्केटमध्ये व्यापार चालू.

20
0
Share:

दीपाली बोडवे,एपीएमसी न्युज .कॉम

मुंबई: आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी त्यांनी बोलताना “जय जवान जय किसान” असा नारा त्यांनी दिला.आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या.


एकीकडे आपण जर बघितलं तर संपूर्ण देशात स्वातंत्र दिन साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत.त्याच बरोबर आशिया खंडातील मोठ्या बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये असलेलत्या पाच मार्केट धान्य,मसाला,कांदा बटाटा,फळे व भाजीपाला मार्केट आहे यामध्ये चार मार्केट बंद असून भाजीपाला मार्केट सुरू आहे बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.

आज एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 350 गाड्यांची आवक झाली असून. याठिकाणी ना मास्क, ना कोणत्याही प्रकारच्या सोशल डिस्टनसिंग चे पालन केले जात नाही. तर एकीकडे एपीएमसीचे वरीष्ठ अधिकारी, सुरक्षा रक्षक यांचे ध्वजारोहण सुरू असताना भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.याबाबत अधिकाऱ्यांशी बातचीत केली असता त्यांचे असं म्हणणं आहे की, मार्केट चालू आहे का? आम्हाला माहीत नाही असा प्रतिसवाल त्यांनी केला. तर दुसरीकडे एपीएमसी चे संचालक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा माल आहे विकावा लागतो. पण प्रत्यक्षात मात्र, इथे एकही शेतकरी माल विकायला येत नाही.


शेतकऱ्याच्या नावाखाली मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये व्यापार केला जातो. पण यामध्ये शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा नफा मिळत नाही. काही दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीणमध्ये शेतीचा हमीभाव मिळाला नाही म्हणून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. संपूर्ण राज्यात आज मार्केट बंद असताना आणि
सात दिवस सुरू असणाऱ्या मार्केट एक दिवस बंद ठेवायला पाहिजे होता अशी चर्चा बाजार आवारात होत आहे.आणि एपीएमसी मार्केटमध्ये असे सांगितले जाते की, शेतकऱ्याच्या नावाखाली एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला बिकला जात आहे मात्र प्रत्यक्षात शेतऱ्याला कोणत्याही प्रकारचा हमीभाव मिळत नाही तर मिळत असेल शेतकरी आत्महत्या करणार नाही . शेतकऱ्याचा माल विकतो पण याचा नफा नक्की कोणाला मिळतो? हा प्रश्न सर्वांसाठीच अनुत्तरित आहे.

Share: