ही’ टेलीकॉम कंपनी भारतातून गुंडाळणार गाशा ?

23
0
Share:

‘ही’ टेलीकॉम कंपनी भारतातून गुंडाळणार गाशा ?

भारतातील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली व्होडाफोन भारतात गाशा गुंडाळण्याची शक्यता आहे. आर्थिक मंदीचा फटका व्होडाफोनला बसला असल्याचं समजतंय. व्होडाफोन सध्या तोट्यात असल्याची माहितीही मिळतेय. काही दिवसांपूर्वी आयडिया आणि व्होडाफोन एकत्र आल्या होत्या. दरम्यान, यासंदर्भात कंपनीकडून अद्याप काहीही स्पष्ट कऱण्यात आलेलं नाही.

जिओ आल्यानंतर आयडिया आणि व्होडाफोन यांचं मर्जर झालं आहे. आता, या दोन्ही कंपन्या एकत्रित काम करतायत. IANS या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार व्होडाफोनने आपला गाशा गुंडाळला आहे आणि कोणत्याही क्षणी ही कंपनी भारतातून आपला पाय काढू शकते.

अशातच गेल्या काही काळात व्होडाफोनच्या कस्टमर्सच्या संख्येतही कमालीची घट झालीये. ज्याचा मोठा फटका या कंपनीला बसलाय. व्होडाफोनची शेअर व्हॅल्यू देखील प्रचंड पडलीये. 2019 मध्ये कंपनीला 4067 करोडचं नुकसान झालंय. 2018 च्या तुलनेत हे नुकसान दुप्पट आहे.

सुप्रीम कोर्टाने AGR निकालाअंतर्गत व्होडाफोन-आयडियाला 28,309 कोटी रुपये देण्यास सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शक्य झाल्यास कंपनी कोर्टाच्या या आदेशाच्या पुनरावलोकनासाठी अर्ज दाखल करू शकते.

त्यामुळे तुमच्याकडे जर Vodafone चं सिम असेल तर या कंपनीच्या बाबतीतील ही बातमी तुमचा त्रास येत्या काळात वाढवू शकते.

Share: