आज आणि उद्या मराठवाडा आणि विदर्भात पाऊस येण्याची शक्यता

24
0
Share:

महाराष्ट्र कृषिविभागाने मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे आणि त्यामुळे कृषिविभागाने शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्याच्या किमान तापमानामध्ये वाढ होत असल्याने थंडी कमी होत चालली आहे आणि दुपारच्या उन्हाचा चटका वाढत चालला आहे.काल सोलापूर येथे राज्यातील उच्चकी तापमान ३५.७ अंश सेल्सिअस तर ब्रम्हपुरी येथे नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक असं वातावरण तयार होत असल्यामुळे आज आणि उद्या विदर्भ आणि मराठवाड्यासह वादळी वारा, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Share: