रेणू शर्मावर कृष्णा हेगडेंचा खळबळजनक आरोप; धनंजय मुंडे सेफ?

3
0
Share:

मुंबईः भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे एका नव्याच वादाला फोडणी मिळालीय. यासंदर्भात कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिलं असून, कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केलाय. कृष्णा हेगडेंच्या या आरोपांमुळे धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरून लक्ष काहीसं विचलित होण्याची शक्यता आहे. तसेच धनंजय मुंडेंला कृष्णा हेगडेंच्या प्रकरणाचा आधारही मिळू शकतो.

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलाय. परंतु धनंजय मुंडेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. त्यातच आता कृष्णा हेगडेंनी रेणू शर्मा 2010 पासून मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत असल्याचा गौप्यस्फोट केलाय. त्यामुळे रेणू शर्मा आता स्वतः अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केलेत. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होत्या. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.

मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरूच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशा प्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत.

“मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं, की मी तुला भेटण्यात अजिबात रस नाही, मग तिच्या मागणीनुसार रिलेशनशिप ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी 6 आणि 7 जानेवारी 2021 रोजीही तिने मला व्हॉट्सअॅप केले. मी थंबचा इमोजी पाठवण्याशिवाय काहीच रिप्लाय दिला नाही” अशी माहिती कृष्णा हेगडे यांनी पत्रात दिली आहे. “दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मीडियामध्ये केलेले आरोप वाचून मी थक्क झालो. त्याच वेळी मी रेणू शर्माबद्दल तुम्हाला सांगण्याचा निर्णय घेतला,” असंही कृष्णा हेगडेंनी सांगितलं. “आज त्यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केले आहे, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो, उद्या दुसरं कोणी असेल. ही आमिषाने भुलवणे, हनी ट्रॅप, ब्लॅकमेल आणि खंडणी वसुलीची कार्यपद्धत आहे. मी मुंबई पोलिसांना विनंती करतो, त्यांनी एफआयआर दाखल करुन तार्किक निष्कर्ष काढावा” अशी विनंती कृष्णा हेगडेंनी केली आहे.

Share: