गांधी जयंतीच्या निमित्ताने नवी मुंबईत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

22
0
Share:

नवी मुंबई: आज गांधी जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबई म्हणारपालिकेतर्फे अभिनव उपक्रम राबवण्यात आला. नवी मुंबईतील विविध ठिकणी सिग्नलवर मास्क न लावणाऱ्या लोकांना गुलाबाचे फुल व मास्क देऊन. मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

तसेच केंद्र सरकाराने गेली सहा वर्षे सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात नवी मुबंई पालिकेने आपले देशातील तिसरे व राज्यातील पहिले स्वच्छ शहराचा मिळालेला सन्मान कायम ठेवण्यासाठी आज पासून पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

करोनाकाळातही स्वच्छता कायम ठेवून काही वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गुुरुवारी एक बैठक घेतली. हे अभियान अधिक जोमाने राबविण्याचे मार्गदर्शन त्यांनी या बैठकीत केले.

आज पालिका मुख्यालयात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सामाजिक अंतर राखून केवळ पंधरा साफसफाई कामगारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम केला जाणार आहे. सामाजिक अंतराचा नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वच्छता हा या आजाराला दूर ठेवण्याचा एक उत्तम मार्ग असल्याने त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी ऑनलाइन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

करोनाकाळात जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना समाजमाध्यमांचा वापर केला आहे. हाच मार्ग महापालिका पहिला क्रमांक मिळविण्यासाठी वापरणार आहे.

Share: