मोदींना पुन्हा निवडून द्या त्यानंतर आम्ही नक्की राम मंदिर बांधू – सुब्रमण्यम स्वामी

19
0
Share:

सुब्रमण्यम स्वामी हे भाजप मधील हे एक चर्चित नाव आहे ते आपल्या नेहमी वादग्रस्त विधानामुळे ओळखले जातात. भारत विकास परिषद (चेंबूर) यांनी आयोजित आजच्या सभेत बोलताना त्यांनी हे विधान केल आहे.

या आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी खूप काही वादग्रस्त मुद्द्यांवर आपलं मत मांडल आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात प्राचीन भारताचा आणि संस्कृत भाषेविषयी बोलले त्यांनी आपल्या भाषणात नेहरू आणि मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली.

देशातल्या हिंदू आणि मुस्लिमांचा DNA एकच आहे. हिंदू आणि मुस्लिम एकाच परिवाराचा भाग आहेत पण ते स्वत:ला घोरी, गझनीचे वंशज समजत असतील तर त्यांना या देशात स्थान नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

सरदार पटेलांनी देशाची एकात्मता आणि अखंडता कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली2020 ते 2030 दरम्यान पाकिस्तानचे चार तुकडे होतील.

यातूनच पाकिस्तान नष्ट होणार आहे. पाकिस्तान आपल्यावर अणुबाँब टाकू शकत नाही कारण त्याच्या चाव्या अमेरिकेकडे आहे.जोखीम पत्करल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.

Share: